तुम्हाला पंख मिळालेत, तुम्ही भरारी घ्यायला मोकळे : सदाशिव पाटील

विधानासाठी वैभव पाटलांना मोलाचा सल्ला
Sadashiv Patil's Advice to Vaibhav Patal for Legislative Assembly
माजी आमदार सदाशिव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.Pudhari File Photo

विटा : तुम्ही काही अपेक्षा व्यक्त केल्यात, पण एक राजकारणी म्हणून सांगतो, तुम्हाला पंख मिळालेत, तुम्ही भरारी घ्यायला मोकळे आहात, अशा शब्दांत माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी आपले चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांना आमदारकीसाठी पुढे चाल दिली. मात्र राजकारण कधी भावनेवर करायचे नाही. वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती याचे आकलन करायचे असते असे सूचक उद्गार ही माजी आमदार पाटील यांनी काढले.

Sadashiv Patil's Advice to Vaibhav Patal for Legislative Assembly
सांगली : शिराळा पश्चिम भागात मुसळधार; आष्टा-दुधगावात झाडे पडली

माजी आमदार सदाशिव पाटील यांचा उत्साहात साजरा

माजी आमदार सदाशिव पाटील यांचा सोमवारी (दि.१५) वाढदिवस होता. विटा शहरासह तालुक्यात हा वाढदिवस विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला. येथील मायणी रस्त्यालगतच्या आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हा भरा तून आलेल्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार संजय पाटील, अशोकराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, सचिन शितोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Sadashiv Patil's Advice to Vaibhav Patal for Legislative Assembly
सांगली : जत तालुक्यातील वृक्षतोडीच्या वृत्ताची सयाजी शिंदेंकडून दखल

सर्वांनी मिळून एकत्रित काम करूया : वैभव पाटील

यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले, तुमच्याबरोबरची माणसं बरोबर ठेवा. थोरामोठ्यांना आदर द्या. यश तुमच्याबरोबर आहे, अजिबात घाबरू नका. तुम्हाला पंख मिळालेत, तुम्ही भरारी घ्यायला मोकळे आहात. मनात धरलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही धडपडताय, याचा मला सार्थ अभिमान आहे. यश- अपयश परमेश्वरावर सोडूया. पण ज्या लोकांच्यामुळे आपल्याला वैभव मिळाले, ज्या लोकांच्या जीवावर आपण राजकारण करतो, त्यांच्याप्रती आपल्या मनामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. त्यांच्या साठी अविरत कष्ट करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, असा अपेक्षाही माजी आमदार पाटील यांनी बोलून दाखवल्या. त्यापूर्वी वैभव पाटील यांनी आपल्या भाषणात लोकनेते हणमंतराव पाटील साहेबांच्यापासून आपल्या बरोबर असणारे काही कार्यकर्ते बाजूला गेले असतील. त्यांच्याशी संपर्क करतो आहे. परवा वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी देखिल अनेक कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. भाऊ, तुम्ही या सर्व उपक्रमांपासून अलिप्त राहता, याचे माझ्या मनामध्ये शल्य आहे. तुम्ही, आम्हा सर्वांना बरोबर घेऊन गेले पाहिजे. सर्व असताना तूम्ही बाजूला राहता, याची खंत आहे. तुम्ही आमची ताकद आहात, एनर्जी आहात. एक क्षणही तुम्ही आमच्यापासून दूर राहू नका, अशी विनवणी केली. मात्र हे बोलताना वैभव पाटील यांचा आवाज कातर झाला होता, तसेच त्यांच्या डोळ्यातून पाणीही पाझरले.पुढे ते म्हणाले, विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोण निवडणूक लढवायची? हे आपण ठरवू पण तुम्ही बरोबर पाहिजेत. सर्वांनी मिळून एकत्रित काम करूया, अशी ग्वाहीही वैभव पाटील यांनी दिली. यावेळी सदाशिवराव पाटील यांचे दुसरे चिरंजीव विशाल पाटील यांच्या सह राजू जानकर, भरत कांबळे, विनोद पाटील, लेंगरेचे अशोकराव मोरे, शंकर आयवळे,शरद उर्फ शेरा पवार, सिकंदर ढालाईत,सुजित पाटील, सावंत, पांडुरंग पवार, सौरभ पवार,पप्पूशेठ कदम, नाना कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Sadashiv Patil's Advice to Vaibhav Patal for Legislative Assembly
सांगली : प्रतापसिंह उद्यानात साकारतेय पक्षी संग्रहालय

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news