इस्लामपूर : राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी गळीत हंगाम २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते आ. सदाभाऊ खोत यांनी राज्याच्या साखर आयुक्तांकडे केली आहे.
साखर आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील साखर कारखान्यांचा २०२४-२५ चा गळीत हंगामाला १५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. त्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरातील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या राज्यभरात गावोगावी दाखल होऊ लागल्या आहेत. परंतु महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबरला आहे. साखर कारखान्याचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरला चालू केल्यास ऊस तोडणी कामगार आणि संबंधित इतर लोक हे मतदानापासून वंचित राहतील. त्यामुळे या बाबींचा गांभीर्याने विचार करून कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, याकरिता या वर्षीचा गळीत हंगाम २१ नोव्हेंबर नंतर सुरू करणेबाबतचा सुधारित अध्यादेश काढावा.