

सांगली : विद्यार्थ्यांबाबत केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) सांगली शहर जिल्हाच्यावतीने बुधवारी कॉलेज कॉर्नर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.
अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर आणि बांधकाम कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. विनायक हेगडे यांनी, सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.
आंदोलनात अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष ईर्शाद पखाली, नितीन माने, अजहर सय्यद, प्रकाश कांबळे, अमित चव्हाण, प्रियानंद कांबळे, कबीर व्हनकटे, अश्रफ चाऊस, एजाज काझी, शफीक शेख, मुस्ताक मुल्ला आदी सहभागी होते.