Sangli fuel availability: सांगली जिल्ह्यात पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरली

सांगली जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल पंपांची परस्थिती शुक्रवारीही ‌‘जैसे थे‌’ होती. दिवसभर अनेक पंप बंद राहिले
Petrol Pump
Petrol Pump प्रातिनिधीक छायाचित्र Pudhari
Published on
Updated on

सांगली : सांगली जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल पंपांची परस्थिती शुक्रवारीही ‌‘जैसे थे‌’ होती. दिवसभर अनेक पंप बंद राहिले; मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ग्राहकांनी गरजेपेक्षा जास्त इंधनाची खरेदी केल्याने सुरू असलेल्या पंपांवरील गर्दी ओसरल्याचे चित्र होते.

सांगली जिल्ह्यात पेट्रोलचा आयओसीएल कंपनीचा 1320 किलोलिटर, बीपीसीएलचा 610 किलोलिटर व एचपीसीएलचा 530 किलोलिटर असा एकूण 2460 किलोलिटर साठा शिल्लक आहे. डिझेलचा आयओसीएल कंपनीचा 1445 किलोलिटर, बीपीसीएलचा 780 किलोलिटर व एचपीसीएलचा 650 किलोलिटर असा एकूण 2875 किलोलिटर साठा शिल्लक आहे.

एलपीजीचा एचपीसीएल कंपनीचा 396 टन, आयओसीएलचा 55 टन व बीपीसीएलचा 116.3 टन असा एकूण 567.3 टन साठा शिल्लक आहे. बीपीसीएलचा 83.1 टन एलपीजी मार्गावर असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news