Bribery case: लाच घेणारा महसूल सहायक ‘लाचलुचपत‌’च्या जाळ्यात

कवठेमहांकाळ तहसील कार्यालयात कारवाई, दोन अर्जांसाठी 200 रुपयांची मागणी
Bribery Case
Bribery CaseFile Photo
Published on
Updated on

सांगली : पंचायत समितीच्या उमेदवारी अर्जासाठी दोनशे रुपयांची लाच घेताना कवठेमहांकाळ तहसील कार्यालयातील महसूल सहायकाला ‌‘लाचलुचपत‌’ने रंगेहात अटक केली. सुभाष बाळासाहेब पाटील (वय 54) असे त्याचे नाव आहे. ‌‘लाचलुचपत‌’च्या पोलिस उपअधीक्षक यास्मीन इनामदार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तक्रारदार यांची पत्नी पंचायत समितीची निवडणूक लढविणार होती. त्यासाठी तक्रारदार हे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयात गेले होते. त्यांनी सुभाष पाटील या महसूल सहायकाकडे उमेदवारी अर्जाची मागणी केली. त्यावेळी सुभाष पाटील यांनी एका अर्जाला 100 रुपये देण्याची मागणी केली. त्यावेळी तक्रारदार यांनी, त्याची पावती मिळणार का? अशी विचारणा केली. परंतु त्याची पावती मिळणार नाही, असे सुभाष पाटील यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज मोफत असताना प्रत्येक उमेदवारी अर्जासाठी महसूल सहायक सुभाष पाटील यांनी 100 रुपये घेतल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार उपअधीक्षक यास्मीन इनामदार यांच्या पथकाने कवठेमहांकाळ तहसील कार्यालयात सापळा लावला होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या दोन अर्जांसाठी 200 रुपये स्वीकारताना सुभाष पाटील याला रंगेहात अटक करण्यात आली. याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपअधीक्षक यास्मीन इनामदार यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण, किशोरकुमार खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, चंद्रकांत जाधव, सलीम मकानदार, सुदर्शन पाटील, सीमा माने, सागर नायकुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news