Sangli fraud: ऊस वाहतूकदाराची 5 लाखांची फसवणूक; धुळ्याच्या दोघांवर गुन्हा

ऊस तोडणी मजूर पुरवतो म्हणून ऊस वाहतूकदाराची 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी धुळे जिल्ह्यातील दोघा मुकादमांवर ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला
Fraud Case
Fraud Casefile photo
Published on
Updated on

ईश्वरपूर : ऊस तोडणी मजूर पुरवतो म्हणून ऊस वाहतूकदाराची 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी धुळे जिल्ह्यातील दोघा मुकादमांवर ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रकांत पंडित कोळी, कैलास वामन भिल (दोघे रा. वायपूर, ता. सिंदखेड, जि. धुळे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित मुकदामांची नावे आहेत.

ऊस वाहतूकदार अशोक राजाराम जाधव (रा. दुधोंडी, ता. पलूस) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. हा फसवणुकीचा प्रकार गेल्यावर्षी ईश्वरपूर येथे घडला होता. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गेल्यावर्षी मे महिन्यात अशोक यांना ऊस गळीत हंगामासाठी संशयित चंद्रकांत, कैलास यांनी 20 ऊस तोडणी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवले होते. अशोक व चंद्रकांत, कैलास यांच्यात गेल्यावर्षी करार झाला होता. अशोक यांनी उचल म्हणून दोघांना 5 लाख रुपये दिले होते.

मात्र, ऑक्टोबर, नोव्हेंबर 2025 मध्ये कारखान्याचा ऊस हंगाम सुरू झाला तरी दोघांनी मजूर पुरवले नाहीत. अशोक यांनी पैशाची मागणी केली असता ते दोघे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. ऊस गळीत हंगाम संपला तरी चंद्रकांत, कैलास यांनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे अशोक जाधव यांनी पोलिसांत धाव घेत दोघांविरोधात फिर्याद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news