

कुंडल ः कुंडल (ता. पलूस) येथील अतिप्राचीन अतिशय तीर्थक्षेत्रावरील पुरातन मूर्तींची विटंबना करणार्या आरोपींना तत्काळ अटक करा. त्यांच्यावर कडक करवाई झाली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
शेट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. कुंडल पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक जयसिंग पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली.
यावेळी संदीप राजोबा, पार्श्वनाथ दिगंबर जैन सिद्ध अतिशय क्षेत्राचे विश्वस्त दीपक वर्णे, तीर्थराज नवग्रह जिन मंदिरचे उपाध्यक्ष सचिन लडगे, विश्वस्त प्रफुल्ल पाटील, तसेच अॅड. दीपक लाड उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, काही समाजकंटक जाणून-बुजून वातावरण गढूळ करीत आहेत. या प्रकरणाचा तत्काळ छडा लावावा.