

सांगली : जिल्हा पुरवठा विभाग आणि अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या पथकाने सांगली, मिरजेत अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या दोन अड्ड्यांवर छापा टाकून 25 बेकायदा गॅस सिलिंडर, रिफिलिंगच्या तीन मशिनरी जप्त केल्या. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलूके, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या सहकार्याने मिरज रस्त्यावरील विजयनगर परिसरातील हॉटेल सह्याद्रीसमोर अवैध गॅस रिफिलिंग केंद्रावर छापा टाकून 16 गॅस व रिफिलिंगचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर सांगली रेल्वे स्टेशनसमोरील एका केंद्रावर छापा टाकून 9 गॅस सिलिंडर व साहित्य जप्त करण्यात आले. या दोन्ही छाप्यात एकूण 25 गॅस सिलिंडर, रिफिलिंगच्या तीन मशिनरी व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
याप्रकरणी अमोल अशोक हांगे, किरण हरिभाऊ भोसले (दोघे रा. वानलेसवाडी, सांगली) व संजय मारुती कोळेकर (रेल्वे स्टेशनसमोर, सांगली) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक चेतन माने, पुरवठा निरीक्षक राजू कदम, मिरजेच्या निरीक्षक वर्षा कदम, प्रफुल जाधव, स्वप्निल फडतरे, विकास खुरुमूटे यांच्या पथकाने केली.