

सांगली : शहरातील बस स्थानक ते सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावर सुरू असणाऱ्या तीनपानी जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सातजणांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाख 52 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये फारूख इलाही पखाले (वय 40), सद्दाम इस्माईल नदाफ (वय 32), शमशुद्दीन युसूफ पखाली (वय 37, तिघेही रा. मुजावर प्लॉट, सांगली, रुणाल रणजित कांबळे (वय 24), सूरज दस्तगीर मांजरे (वय 38), आदित्य प्रकाश शिकलगार (वय 22), तिघे रा. हरिपूर रस्ता, सांगली), सुमीत प्रकाश चव्हाण (वय 51, रा. शिवाजी मंडई, सांगली) आणि रणजित रघुनाथ चव्हाण (वय 40, रा. सांगली) यांचा समावेश आहे.
सांगली शहरात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेश दिले होते. त्यानुसार बस स्थानक ते सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावर सातजण तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू आहे.