

आष्टा : बागणी (ता. वाळवा) येथील बागणी-खोची रस्त्यालगत मुरलीधर मनोहर बामणे यांच्या शेतातील कौलारू घरामध्ये तीन पानी जुगार अड्डा सुरू होता. रविवार, दि. 20 रोजी रात्री सायबर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून हा अड्डा उद्ध्वस्त केला. कारवाईत 39 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी, मोटारी व जुगाराचे साहित्य, असा एकूण 51 लाख 50 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत सायबर पोलिस विभागाकडील विजय पाटणकर यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरील सर्व संशयितांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 4 व 5 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वाळवा तालुक्यातील बागणी येथे खोची रस्त्यालगत असलेल्या मुरलीधर मनोहर बामणे यांच्या शेतातील कौलारू घरामध्ये तीनपानी जुगार अड्डा सुरू होता. याबाबतची माहिती सांगली येथील सायबर पोलिसांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर विभागाचे पोलिस उपनिरीक्षक अफरोज पठाण यांनी रविवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी जुगार खेळणार्या 39 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या ठिकाणाहून 39 मोबाईल, 14 दुचाकी, चारचाकी वाहने, 1 लाख 14 हजार 350 रुपये रोख रक्कम, असा एकूण 51 लाख 50 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे अशी, महंमदहनिफ महंमुद्दीन वाटे (वय 50, रा. कुडची, जि. बेळगाव), मन्सूर नजीर मुजावर (37, रा. बागणी, ता. वाळवा), अझरुद्दीन कलंदर पठाण (27, रा. हेरले, ता. हातकणंगले), मुबारक मौला नायकवडी (55, रा. बागणी, ता. वाळवा), आकाश ज्ञानदेव सावंत (29, रा. चांदोली वसाहत, आष्टा), सागर जयसिंग भोसले (43, रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले), राहुल प्रकाश आवटी (45, रा. दुधगाव, ता. मिरज), बाहुबली धनपाल पाटील (43, रा. दुधगाव, ता. मिरज), बंडू महादेव बोटे (44, पेठवडगाव, ता. हातकणंगले), आरिफ गुड्डुसाब होनवाड (35, रा. अथणी, ता. बेळगाव), अक्षय राजेंद्र करमाळकर (28, रा. वडनगे ता. करवीर), सुशांत नामदेव सावंत (30, रा. चांदोली वसाहत, आष्टा), शिरीष अण्णाराव कस्तुरे (58, रा. करवीर, जि. कोल्हापूर), संजय अंतू सावंत (44, कोल्हापूर), किरण दिलीप बेडेकर (42, रा. कोल्हापूर), इलाही गुलाब तांबोळी (51, रा. तासगाव, जि. सांगली), अनिस आलमगीर पेंढारी (30, रा. हेरले, ता. हातकणंगले), शिवाजी महादेव जावंदाळ (50, रा. कोल्हापूर), अजय तुकाराम शेटे (30, रा. नरंदे, ता. हातकणंगले), सूरज उदय चव्हाण (39, रा. कोल्हापूर), शिवराज सदाशिव नाईक (43, रा. कुडची, जि. बेळगाव), महंमदहनिफ ऐनुद्दीन तांबोळी (49, रा. तासगाव जि. सांगली), मोहसिन जैनुलाब्दीन शाकले (36, रा. कुडची, जि. बेळगाव), पृथ्वी जगताप (वय 35), सलमान मुबारक नायकवडी (31, रा. बागणी, ता. वाळवा), सयाजी हावरे (50), ओंकार प्रभाकर मिठारी (30, रा. कोल्हापूर), ज्ञानदेव बिरनाळे (46), संग्राम रणजित इंगळे (29, रा. कोल्हापूर), विश्वंभर उमाजी मिठारे (27, रा. हुपरी, जि. कोल्हापूर), इम्तियाज इकबाल खतीब (38, रा. हेरले, ता. हातकणंगले), सनाजुलअली अझहरअली शेख (31, रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. कोल्हापूर), रामचंद्र पांडुरंग पाटील (50, रा. फाळकेवाडी ता. वाळवा), चंद्रकांत मारूती शिंदे (40, पडळ ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), तालीब लियाकत मुजावर (29, रा. आष्टा), संजय लक्ष्मण सावंत (40, रा. आष्टा), श्रीशैल सरण्या हिरेमठ (60, रा. उगारखुर्द, ता. कागवाड, जि. बेळगाव), उमेश श्रीशैल संकेश्वर (35, रा. उगार, ता. कागवाड), अजिंक्य प्रकाश पाटील (37, रा. कोल्हापूर) याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.