Sangli News : पुणे येथे शासकीय धान्य गोदामातील हमालांचा संप

थेट वाहतूक धोरणाची अंमलबजावणी थांबविण्याची मागणी
Mathadi Worker
शासकीय धान्य गोदामातील हमालpudhari photo
Published on: 
Updated on: 

सांगली : शासकीय धान्य गोदामांमधील हमाल व माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवारपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सांगली जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमधील हमाल-माथाडी कामगारही काम बंद ठेवून सहभागी झाले आहेत.ृ

शासकीय धान्य गोदामांमध्ये थेट वाहतूक धोरणाची अंमलबजावणी करून खासगी कंत्राटदारामार्फत कामे करण्याचा निर्णय प्रशासनाने तातडीने मागे घ्यावा, अशी प्रमुख मागणी कामगार संघटनेने केली आहे. या संदर्भात सांगलीच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

थेट वाहतूक धोरणांतर्गत होणारी हमालीची कामे संबंधित गोदामात पूर्वीपासून कार्यरत असलेल्या व माथाडी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या हमालांकडूनच करून घेण्यात यावीत, तसेच याबाबत कंत्राटदारांवर स्पष्ट बंधने घालावीत, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समितीने दिला आहे.

पुणे येथील आंदोलनात राजकुमार घायाळ, सुभाष लोमटे, विकास मगदूम, निवृत्ती धुमाळ, अरुण रांजणे, शिवाजी शिंदे, गोरख मेंगडे, अंकुश अवताडे, विष्णू गर्जे, संदीप धायगुडे, संदीप मारणे, अनिल डोंबाळे, हुसेन पठाण आदी कृती समितीचे पदाधिकारी व कामगार सहभागी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news