‘पुढारी टॅलेंट चाचणी’ : चौथी, सातवीत तासगाव, सहावीत जत तालुक्याची बाजी

राज्यात पहिल्यांदाच झेडपीच्या शाळांत झाला ऑनलाईन टॅबवर चाचणीचा नावीन्यपूर्ण उपक्रम
Pudhari Talent Test
‘पुढारी टॅलेंट चाचणी’
Published on
Updated on

सांगली ः दै. ‘पुढारी’ आणि सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘पुढारी टॅलेंट चाचणी’त चौथी आणि सातवीमध्ये तासगाव तालुक्याने बाजी मारली आहे. चौथीच्या तालुकानिहाय गुणांकनामध्ये तासगाव तालुक्यातील 35 विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण पटकाविले आहेत. तसेच याच तालुक्यातील 12 विद्यार्थ्यांनी सातवीतही चांगले गुण मिळवले आहेत. सहावीमध्ये तालुक्यातील यादीमध्ये सर्वाधिक जत तालुक्यातील 7 विद्यार्थी चमकले आहेत.

दै. ‘पुढारी’ आणि जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यात प्रथमच ऑनलाईन टॅबवर 10 मार्च ते 7 एप्रिल म्हणजेच 27 दिवस ‘पुढारी टॅलेंट सर्च’ चाचणी घेण्यात आली. झेडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच 136 केंद्र शाळांमध्ये ऑनलाईन चाचणी दिली. त्यामुळे जिल्ह्यात निकालाबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांतही उत्सुकता होती. या चाचणीचा निकाल नुकताच दै. ’पुढारी’कडून जाहीर करण्यात आला. शिक्षण विभागाकडूनही ऑनलाईन निकाल प्रसिद्ध केला आहे. चौथी, सहावी आणि सातवीतील विद्यार्थ्यांची प्रत्येक इयत्तेमधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच तालुकानिहाय प्रत्येक इयत्तेतील प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले आहेत. त्यामध्ये काही ठिकाणी विद्यार्थ्यांना समान गुण मिळाले आहेत.

मान्यवरांच्याहस्ते शुक्रवारी सन्मान

जिल्हा परिषदेतील पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात शुक्रवार दि. 25 रोजी जिल्ह्यातील आणि तालुक्यातील क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, ‘प्राथमिक’चे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये चाचणीची दखल

जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्यांदाच सर्वाधिक विद्यार्थ्यांची ऑनलाईन चाचणी घेण्याचा विक्रम पुढारी पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि जिल्हा परिषद सांगलीने केला आहे. अत्यंत कमी कालावधीत यशस्वीपणे ही चाचणी घेण्यात आली. या उपक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने दखल घेतली आहे. तसेच या संस्थेच्या रेकॉर्डवर सदर उपक्रमाची नोंद झाली आहे. याबाबतचे विशेष प्रमाणपत्र देऊन प्राथमिक शिक्षण विभाग आणि दै. पुढारीचा शुक्रवारी गौरव करण्यात येणार आहे.

चौथीमध्ये जिल्ह्यात प्रथम तीन क्रमांक आलेले विद्यार्थी...

तासगाव तालुक्यातील सावळज शाळेतील अथर्व गजानन निकम, सिद्धार्थ धनाजी यादव (काशिदवाडी, ता. जत) आणि श्रीतेज दीपक पाटील (शिरशी, ता. शिराळा) या तिघांनाही चौथीमध्ये 100 पैकी 94 गुण मिळाले आहेत. त्यामुळे या तिघांना विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला. तसेच वर्धमान राजेंद्र शेट्टी (आरग, ता. मिरज), श्रावणी संतोष कोरे (मौजे डिग्रज, ता. मिरज), विघ्नेश विक्रम जमदाडे (सावळज, ता. तासगाव), विराज शिवलिंग कोरे (मोरगाव, ता. कवठेमहांकाळ), शर्विल सुहास पाटील (कुची, ता. कवठेमहांकाळ) या पाचजणांनी 92 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकाविला. अर्थव चंद्रकांत शिंदे (आरग, ता. मिरज), सुरुची रमेश कोरे (आरग, ता. मिरज), आरोही सुकुमार चांदोबा (आरग, ता. मिरज), प्रणव अरुण चव्हाण (अशोकनगर, ता. मिरज), आयुष नानासाहेब माने (चिंचणी, ता. तासगाव), सम्राट सुनील धायगोंडे (कवठेएकंद, ता. तासगाव), वरुणराज पांडुरंग झांबरे (डोंगरसोनी, ता. तासगाव), स्वरा शशांक पाटील (नेहरूनगर, तासगाव), आरती विजय जाधव (काशिदवाडी, ता. जत), आयुष कृष्णदेव यादव (काशिदवाडी, ता. जत), गुंजन गणपती सातपुते (कोडगवाडी, ता. जत) या अकराजणांना 90 गुण मिळाले. त्यांना विभागून तिसरा क्रमांक देण्यात आला.

तालुक्यातील चौथीमधील उत्कृष्ट गुणप्राप्त विद्यार्थ्यांची नावे...

आटपाडी - युवराज सुधीर गळवे (विठलापूर), वेदांती विजय सावंत (रामनगर), कैवल्य प्रवीण कुलकर्णी (लिंगाडे वस्ती), सृष्टी संतोष ननावरे (शेटफळे), मनस्वी मनोज तारळेकर (यपावाडी), सार्थक मधुकर ढोले (दिघंची), आरती सीताराम गळवे (आटपाडी). जत - दिव्या सुरेश टेंगळे (दरीबडची), श्रेयस गोरखनाथ सावंत (काशिदवाडी), आनंदी संजय कापसे (नाईक वस्ती शेगाव), श्रेया सदाशिव बिरादार (वज्रवाड), रिष रविकिरण काटे (वज्रवाड), अहिल्या सचिन देवकाते (येळदरी), निधी सुभाष सरगर (येळदरी), पृथ्वीराज शिवाप्पा अजूर (सिंदूर). कडेगाव - दुर्वा अभिजित जाधव (कडेगाव), सार्थ ज्ञानेश्वर जाधव (नेवरी), नम्रता प्रदीप माळी (हिंगणगाव), आराध्या शंकर यादव (रामापूर वस्ती), राजवीर शिवाजी माने (हणमंतनगर), सिराज भिकुलाल कुंभार (निमसोड), अभिलेष आनंदराव रूपनर (अमरापूर).

कवठेमहांकाळ - शर्वरी शीतल ननावरे (थबडेवाडी), पल्लवी पांडुरंग हिरगुडे (खरशिंग), समर्थ विजय कोरे (नागज), स्वराज भारत सूर्यवंशी (करोली टी), अनुश्री श्रीहरी भोसले (रांजणी), श्रेयस रमेश परीट (कोकळे), शंकर हणमंत जाधव (आगळगाव), अर्णव दीपक माळी (देशिंग), श्रेया संभाजी शिंदे (नागज), श्रेजल सचिन पाटील (कुची), रितीशा राहुल सूर्यवंशी (कुची), श्रेयश विलास भोसले (धुळगाव), श्रेया श्रीकांत कुत्ते (थबडेवाडी), आदिती चंद्रकांत कुंभार (रांजणी), चेतन अरविंद शिंदे (बोरगाव), साईराज सूर्यकांत पाटील (बोरगाव), नक्षत्रा दीपक ढबू (अलकुड एम.). खानापूर - आराध्या प्रसाद कलढोणे (रेणावी), रुहिका महेंद्र सूर्यवंशी (भाळवणी), आयेशा बाबू सय्यद (पवार मळा), शिव अमित नलावडे (पंचलिंगनगर), सोहम विजय जाधव (घोटी बुद्रुक). मिरज - शिवतेज अमर पाटील (विद्यानगर), जान्हवी गोरख मामरदांडे (एरंडोली), श्रुती विजय यादव, (कवठेपिरान), वृषभ सचिन पवार (आरग), समर्थ अशोक पाटील (शिंदेवाडी), भाविका प्रशांत सूर्यवंशी (एरंडोली), पीयूष अर्जुन राजपूत (सांबरवाडी), अद्वैैत मीलन नागणे (लिंगनूर), स्वरांजली अधिक पाटील (सोनी), हर्षवर्धन संजय नागठाणे (आरग), कार्तिकी विद्यासागर पाटील (एरंडोली), राजनंदिनी जितेंद्र कोरे (समडोळी), अभिमन्यू दयानंद कांबळे (नरवाड). पलूस - कैवल्य ज्ञानेश्वर रोकडे (माळी भाग), मिथिलेश मनोज हडदरे (कुंडल), ईशानी पंकज पाटील (सावंतपूर वसाहत), श्रेयस सचिन वावरे (भिलवडी), तन्मय नितीन हैद्रे (पलूस), हसन मोहसिन इनामदार (रामानंदनगर), वसुंधरा मल्हाप्पा बन्ने (धनगाव), युगंधर अजित सलगर (अंकलखोप).

शिराळा - राजनंदिनी योगेश पाटील (शांतिनगर, बिऊर), रणवीर पंडित पवार (मांगले), आरोही पांडुरंग जाधव (वाकुर्डे खुर्द), श्रुती विजय दळवी (सागाव), स्वराज राहुल पाटील (रिळे), ऋषी आबासाो पाटील (अस्वलेवाडी), आयेशा मोहन जाधव (वाकुर्डे खुर्द). तासगाव - निशाद कृष्णा पोळ (बोरगाव), राजनंदिनी विशाल पाटील (ढवळी), आयुष अंकुश बोरगे (चिंचणी), समरजित राजेेंद्र जाधव (चिंचणी), अनन्या प्रकाश पाटील (चिंचणी), त्रिशा नवनाथ भोसले (नेहरूनगर), तनिष्का सचिन मस्के (निमणी), आयुष विजय माळी (आळते), रचना विशाल भोसले (बोरगाव), भानुश्री भीमराव माने (ढवळी), श्रेयस सिद्धराज माळी (कवठेएकंद), श्रेया सतीश कोष्टी (कवठेएकंद), आरोही गिरीधर जमदाडे (रामलिंगनगर), वीरेन नितीन जाधव (सावळज), राजवीर रोहित गुरव (निमणी), शिवम राजू पाटील (गव्हाण), अर्णव प्रमोद पाटील (वडगाव), पूर्वा गणेश पवार (बोरगाव), दियांजली नितीन सूर्यवंशी (बोरगाव), सत्यम महादेव सावंत (बोरगाव), वरद काकासाो शेंडगे (बोरगाव), आराध्या निवास कांबळे (लोढे), अविराज निवास जाधव (चिंचणी), अथर्व गजानन खरमाटे (चिंचणी), राजनंदिनी प्रदीप पाटील (चिंचणी), स्पंदन संजय पाटील (वाघापूर), प्रणव विपुल देशमाने (कवठेएकंद), श्रावणी उद्धव जाधव (नागावकवठे), सौम्या अवधूत पवार (गुजरमळा), स्नेहल सुनील पवार (गुजरमळा), प्रांजल राहुल चव्हाण (आरवडे), वीरेन विकास पाटील (आरवडे), श्रेया रेवणसिद्ध होनमोरे (दहिवडी), तन्मय संजय कुंभार (गोटेवाडी), अनन्या संदीप पाटील (राजापूर). वाळवा - भक्ती सचिन पाटील (जक्राईवाडी), सई विशाल पाटील (येडेमच्छिंद्र), स्वरा पंकज येवले (चांदोली वसाहत, वाळवा), रूद्र नागेश गोसावी (बावची), सार्थक बजरंग पडळकर (पोखर्णी), अर्णव संदीप पाटील (नेर्ले).

सहावीमध्ये जिल्ह्यात प्रथम तीन क्रमांक आलेले विद्यार्थी...

सहावीमध्ये खानापूर तालुक्यातील खंबाळे गावातील अनन्या अमोल सुर्वे हिने 94 गुण पटकावून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच याच गावातील श्रुतिका शिवाप्पा अलीबडीला 92 गुण मिळाले आहेत, तिने दुसरा क्रमांक पटकाविला. तसेच विराजराज दिग्विजय कदम (खंबाळे, ता. खानापूर), सोहम अशोक धोंड (बेडग, ता. मिरज) आणि तासगाव तालुक्यातील चिंचणी शाळेतील असद असलम चाऊस या तिघांनाही 90 गुण मिळाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात या तिघांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला आहे.

सहावीमध्ये तालुक्यात उत्कृष्ट गुणप्राप्त विद्यार्थ्यांची नावे...

आटपाडी भक्ती धनपाल सुतार (तडवळे), वेदांत हनुमंत गळवे (गळवेवाडी), गौरव किशोर पिसे (वलवण), जत श्रद्धा विनायक छत्रे (डफळापूर), लक्ष्मी सिदान्ना पाटील (सिद्धनाथ), आकांक्षा अजित कांबळे (मुचंडी), लतिका नवीन संकपाळ (डफ ळापूर), गोपाळ कुंडलिक भैरामाडी (मोरबग्गी), श्रेया बसाप्पा बिदरी (खोजनवाडी), भक्ती शशिकांत शिवनूर (खोजनवाडी). कडेगाव स्वराज संभाजी पाटील ( निमसोड), स्वयम् सदाशिव मोहिते (कडेपूर), नंदिनी विशाल जाधव (हिंगणगाव खुर्द), श्रीया रवींद्र जगदाळे (अंबक). कवठेमहांकाळ स्नेहल मारुती कदम (करोली टी), मयुरेश शिवकुमार दहिंदकर (बोरगाव), शुभांगी विजय माने (कवठेमहांकाळ), आर्या गजानन पाटील (करोली टी), स्वराज्ञा भारत सूर्यवंशी (करोली टी). खानापूर श्रीवर्धन सुभाष मोहिते (खंबाळे), रणजित सतीश साळुंखे (खंबाळे), श्रेयश रूपेश जगदाळे (खंबाळे) मिरज श्रेया अमित सुतार (पद्माळे), सेजल अभिजित चौगुले (मौजे डिग्रज), स्वराज किरण राजमाने (कसबे डिग्रज) पलूस गायत्री संतोष पवार (बांबवडे), रिया विजयसिंह साळुंखे (धनगाव), गुरुदत्त संतोष पवार (बांबवडे). शिराळा समिधा पंडित पवार (मांगले), दुर्वा महेंद्र पटेकरी (मांगले ), अतुल चंद्रकांत शिंगटे ( मांगले). तासगाव अर्णव प्रकाश पाटील (विसापूर), आराध्या रामदास देशिंगे (विसापूर), सृष्टी मारुती मोरे (बिरणवाडी) अराध्या अनिल खराडे (चिंचणी), तनिष्का पांडुरंग पाटील (उपळावी), संस्कार संदीप चव्हाण (सिद्धेवाडी)

सातवीमध्ये जिल्ह्यात प्रथम तीन क्रमांकांवर मुलींची बाजी...

सावळज शाळेतील वृंदा विक्रम जमदाडे हिने 92 गुण संपादन करीत सातवीमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच मिरज तालुक्यातील कवलापूर शाळेतील वैष्णवी चंद्रकांत पाटील, श्रावणी राहुल यादव आणि सृष्टी सचिन निळकंठ या तिन्ही विद्यार्थिनींना प्रत्येकी 90 गुण मिळाले आहेत. तिन्ही विद्यार्थिनी जिल्ह्यात द्वितीय आल्या आहेत. तासगाव तालुक्यातील सेजल महादेव पाटील (मतकुणकी), सिद्धी प्रकाश जमदाडे (मणेराजुरी), साक्षी हणमंत जाधव (सावळज) या तिन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी 88 गुण मिळाल्याने त्यांना विभागून तिसरा क्रमांक देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सातवीमध्ये पहिल्या तिन्ही क्रमांकात मुलींनीच बाजी मारली आहे.

तालुक्यामध्ये सातवीत उत्कृष्ट गुणप्राप्त विद्यार्थी...

आटपाडी - साक्षी बापूसाो कदम (तडवळे), प्रणया पतंग गिड्डे (तडवळे), साईनाथ नामदेव जाधव (शेटफळे), वेदिका विजय गोडसे (प्रकाशवाडी), सृष्टी प्रभाकर गिड्डे (तडवळे), संस्कार प्रवीण पवार (घरनिकी). जत - साक्षी मल्लाप्पा तंग्गी (वळसंग), गिरीश प्रकाश आवटी (जाडरबोबलाद), रेहा रविकरण काटे (वज्रवाड), मलगौंड बसवंतराया बगली (मोरबग्गी). कडेगाव - स्वरांजली अनिल यादव (कडेपूर), विहांग अमोल तांबेवाघ (अंबक), सृष्टी संदीप माळी (हिंगणगाव खुर्द), देवयानी विश्वास लगडे (खेराडेवांगी). कवठेमहांकाळ - मृणाल अभिजित पाटील (खरशिंग), श्रेया गणपती पाटील (बोरगाव), वेदांगी अजित जाधव (करोली टी). खानापूर - श्वेता रामदास कुंभार (ढवळेश्वर), सोहम दत्तात्रय किर्दत (ढवळेश्वर), मीनल माणिक सूर्यवंशी (वाझर), नजमिन बानू (भाळवणी). मिरज - अनुष्का महेश जाधव (भोसे), कृतिका विवेकानंद इचल (बेडग), ईश्वरी प्रशांत पाटील (कवलापूर), विधी विकास चौगुले (भोसे). पलूस - संस्कृती अर्जुन पाटील (धनगाव), साक्षी दिलीप मोहिते (धनगाव), अयन अमोल मणेर (आमणापूर), यश सचिन भोसले (सांडगेवाडी). शिराळा - तौकिरअली अब्दाली पठाण (बिऊर), उत्कर्ष शंकर निंबाळकर (नाटोली), श्रावणी विजय पाटील (शिराळा), अनुष्का अरविंद पाटील (पाडळी).

तासगाव - उत्कर्ष महेशकुमार कोर्टे (चिंचणी), स्वराज आनंदराव जाधव (दहिवडी), अनुष रामकिशन रणदिवे (सावळज), सानिध्या मनोहर शेटे (सावळज), आर्या राजेंद्र दोरकर (सावळज), प्रणोती प्रवीण पोळ (सावळज), शौर्यन मल्हार सूर्यवंशी (सावळज), स्नेहल केरूबा माळी (सावळज), विराज विकास पवार (बोरगाव), सकिब रहिमतुल्ला तांबोळी (बोरगाव), सायली शरद पाटील (डोंगरसोनी), समर्थ एकनाथ नागणे (सावळज). वाळवा - आदिती सुरेश परकरे (काळमवाडी), मधुरा प्रकाश बाबर (कामेरी), आराध्या अमोल पाटील (मर्दवाडी), प्रणिती उत्तम सावंत (काळमवाडी).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news