Sangli News : ईश्वरपूर येथे शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलची धामधूम

13 मार्चपासून नागरिकांसाठी पर्वणी; खरेदी, खाद्यपदार्थांची रेलचेल
Pudhari Kasturi Club |
Pudhari Kasturi ClubPudhari File photo
Published on
Updated on

ईश्वरपूर : ईश्वरपूर येथे शुक्रवार, दि. 13 मार्चपासून सुरू होणाऱ्या शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलची तयारी अंतिम टप्प्यात असून मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते स्टॉल उभारणीचा प्रारंभ करण्यात आला. दै. ‌‘पुढारी‌’ आणि प्रतिराज युवा शक्ती यांच्यावतीने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

17 मार्चपर्यंत चालणारा हा महोत्सव परिसरातील नागरिकांसाठी खरेदी, खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.येथील आमदार जयंत पाटील खुले नाट्यगृह परिसरात दरवर्षीप्रमाणे 13 ते 17 मार्चदरम्यान या फेस्टिव्हलचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महिला व बालकल्याण समिती, उरुण-ईश्वरपूर नगरपरिषद तसेच तनिष्का फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य हे या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक आहेत. शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलमध्ये नेत्रदीपक रोषणाई व नावीन्यपूर्ण सजावट करण्यात येणार आहे.

विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यामुळे नागरिकांसाठी हा उत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, होम डेकोर, गारमेंट्स, फर्निचर, सौंदर्यप्रसाधने, किचन ट्रॉली, मसाले, लोणची, दागिने, बॅग्ज आणि प्लास्टिक वस्तूंची विस्तृत श्रेणी उपलब्ध असणार आहे. चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र दालन उभारण्यात येणार असून ग्राहकांना वाहनांची माहिती, टेस्ट ड्राइव्हची संधी आणि स्पॉट बुकिंगवर विशेष सवलती मिळणार आहेत. याशिवाय विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलही मोठ्या संख्येने असणार आहेत. या विविध कार्यक्रमांमुळे पाच दिवस चालणाऱ्या शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलला अधिक रंगत येणार आहे.

‌‘पार्श्व‌’कडून दररोज पाच कस्तुरी सभासद महिलांना साड्यांचा लकी ड्रॉ...

या पाच दिवसाच्या कार्यक्रमात ईश्वरपूर येथील पार्श्व साडीज्‌‍चे संचालक महेश ओसवाल यांच्याकडून कस्तुरी सभासद महिलांसाठी दररोज पाच साड्यांचा ‌‘लकी ड्रॉ‌’ काढण्यात येणार आहे. सभासद महिलांनी त्यांचे नाव, मोबाईल नंबर व सभासद आईडी नंबरची चिठ्ठी ड्रॉ बॉक्समध्ये टाकणे बंधनकारक आहे. याची सोडत दररोज कार्यक्रमाच्या शेवटी निघणार आहे. खरेदीसोबतच कुटुंबासमवेत आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी हा महोत्सव उत्तम संधी ठरणार आहे. या फेस्टिव्हलमधील मोजकेच स्टॉल्स आता शिल्लक आहेत. नागरिकांनी या पाच दिवसीय महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मधू देसावळे (8308706122) व अमर (9545327545) यांच्याशी संपर्क साधावा.

कार्यक्रमांची रेलचेल

फेस्टिव्हलदरम्यान दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‌‘व्हॉइस ऑफ ईश्वरपूर‌’ प्रस्तुत नामदेव हांडे व मीरा शिंदे यांचा गाण्यांचा कार्यक्रम, नुपूर कथ्थक क्लासचा नृत्याविष्कार, ‌‘मिस अँड मिसेस कस्तुरी‌’ उरुण-ईश्वरपूर स्पर्धा, वेदिका वन ग्रॅम प्रस्तुत मॉडेल फॅशन शो, स्किल डान्स अँड फिटनेस स्टुडिओचा नृत्य कार्यक्रम तसेच सेव्हन कलर म्युझिकल ग्रुपच्या मीनाज दिवाण व तन्वी सावंत यांच्या मराठी-हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news