Pudhari Edu Disha| सांगलीत आजपासून ‘ पुढारी एज्यु. दिशा’

कच्छी जैन भवनमध्ये शैक्षणिक प्रदर्शन; मान्यवरांचे मार्गदर्शन
Pudhari Edu Disha
pudhari photo
Published on
Updated on

सांगली : दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत आणि आता पुढे काय करायचे, असा खूप ताण देणारा सवाल विद्यार्थी आणि पालकांसमोर आहे. कोणता कोर्स घ्यायचा? कोणते क्षेत्र निवडायचे? कुठल्या संस्थेत प्रवेश घ्यायचा? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणि मार्गदर्शन घेऊन येत आहे ‘दै. पुढारी एज्यु. दिशा’ हे बहुप्रतीक्षित शैक्षणिक प्रदर्शन. सांगलीत राम मंदिर चौकातील कच्छी जैन भवनमध्ये आज, शुक्रवार, दि. 6 जूनपासून सुरू होणारे हे प्रदर्शन 8 जूनपर्यंत चालणार आहे. सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन संपन्न होत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन यानिमित्ताने मिळणार आहे.

सांगली येथील शैक्षणिक प्रदर्शनास संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर हे मुख्य प्रायोजक आहेत, तर पॉवर्ड बाय प्रायोजक म्हणून विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे हे लाभले आहेत. एम. आय. टी. विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी आणि भारती विद्यापीठ, पुणे हे प्रदर्शनाचे सहयोगी प्रायोजक असून पीसीईटीज् पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, पुणे, सूर्यादत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे, एम. आय. टी. ए. डी. टी. युनिव्हर्सिटी, पुणे, डेक्कन इन्स्टिट्यूट, सांगली तसेच चाटे शिक्षण समूह हे सहप्रायोजक आहेत. या प्रदर्शनात राज्यभरातील नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहेत.

करिअर मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ आणि नवे करिअर पर्याय एका छताखाली उपलब्ध असणार आहेत. विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, त्यांची गोंधळलेली अवस्था दूर व्हावी आणि पालकांना निश्चितता लाभावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या प्रदर्शनात काय मिळेल...

‘पुढारी एज्यु. दिशा’ प्रदर्शनात वैद्यकीय (चइइड, इअचड, इकचड, इऊड तसेच इतर संलग्न), इंजिनिअरिंग (अख, रोबोटिक्स, सिव्हिल, डिप्लोमा तसेच इतर संलग्न), व्यवस्थापन (ऊइअ, इइअ, चइअ ), अर्थ आणि वाणिज्यविषयक (उअ, उड, इ.उेा.), प्रशासकीय सेवा (णझडउ, चझडउ), खढ (चउअ , इउअ, सायबर सिक्युरिटी), क्रिएटिव्ह (डिझाईन, अ‍ॅनिमेशन, मास कम्युनिकेशन, पत्रकारिता), संशोधन (इ.डल., च.डल., अ‍ॅग्रीटेक) देशसेवा आणि परदेशी शिक्षण अशा अनेकविध क्षेत्रांतील तसेच नवतंत्रज्ञानाच्या अनेक करिअरविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. शिष्यवृत्ती, प्रवेशप्रक्रिया, स्पर्धा परीक्षा व कोर्सेसची माहिती तज्ज्ञ मार्गदर्शक देतील. दहावी-बारावीनंतर योग्य दिशा निवडण्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे.

आजची व्याख्याने...

  • सकाळी 10.30 ते 11 - आयुक्त सत्यम गांधी - मार्गदर्शन.

  • सकाळी 11 ते 12 - डॉ. प्रफुल्ल हत्ते- (अधिष्ठाता, एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी)- विषय- करिअर निवडताना पालकांची भूमिका.

  • सायं. 5 ते 6 - पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटीचे सि. सहा. प्राध्यापक डॉ. युधिष्ठीर राऊत - विषय- जगव्याप्ती वाढत असलेले तंत्रज्ञ : आर्टिफिशियल इंटेलिजन्स)

आज उद्घाटन...

या प्रदर्शनाचे उद्घाटन आज, शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते व महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे मॅनेजमेंट ट्रस्टी विनायक भोसले, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाचे प्रा. राहुल माटे, भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सांगलीच्या संचालिका डॉ. पल्लवी जामसांडेकर, एम.आय.टी. विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी, सोलापूरचे अ‍ॅडमिशन अँड आऊटरीच हेड अनुप सिंग, जिल्हा समन्वयक चाटे शिक्षण समूहाचे मुजावर सादिक, चाटे शिक्षण समूहाचे अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हेड प्रवीण पवार, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सहायक प्राध्यापिका प्रा. अस्मिता जोशी, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटीचे सि. सहा. प्राध्यापक डॉ. युधिष्ठीर राऊत, एम.आय.टी. - एडीटी युनिव्हर्सिटी, पुणेचे (सायबर सुरक्षा विभाग) सहायक प्राध्यापक प्रा. अमन कांबळे, डेक्कन इन्स्टिट्यूट, सांगलीचे संस्थापक व संचालक डॉ. नीलेश शिवाजी खराडे, पुढारी पब्लिकेशन प्रा. लि.,चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

आघाडीच्या संशोधन संस्थांमधील करिअर संधी...

भारतातील नामांकित शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये प्रवेशाबाबत माहिती दिली जाणार आहे. इंजिनिअरिंगसाठी खखढी (जेईई अ‍ॅडव्हान्स), छखढी व खखखढी (जेईई मेन्स), तसेच खखडल व खखडएठी (घतझध, छएएढ, डउइ च्या माध्यमातून) या संस्थांची माहिती मिळेल. संशोधनासाठी इअठउ, ढखऋठ, ऊठऊज, खडठज, उडखठ श्ररली, खखडल, छउइड, छइठउ यामध्ये ॠअढए, छएढ, गएडढ व इतर मार्गदर्शक परीक्षा कोणत्या आहेत याची माहिती मिळेल.

एव्हिएशन क्षेत्रात छऊअ, खअऋ, अऋउअढ, ऊॠउअ मान्यताप्राप्त पायलट कोर्सेसबाबत माहिती मिळेल. मॅरिटाईम क्षेत्रात खचण उएढ, ढड उहरपरज्ञूर, चएठख र्चीालरळ यांच्याद्वारे नौदल व मरीन इंजिनिअरिंगसाठी मार्गदर्शन दिले जाईल. याशिवाय परदेशी शिक्षणासाठी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध परीक्षांनी माहिती मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news