सांगली : राज्यात आमदारकीचे राजकारण तापले असताना आणि आता आज, शनिवारी निकालादिवशी हे टेन्शन हाय झालेले असताना, दुसर्या बाजूला नेते आणि कार्यकर्त्यांसोबत दैनिक पुढारीच्या वाचकांचीही उत्सुकता पणाला लागली आहे.
राजकीय वार्तांकनात नंबर एक असलेल्या दैनिक पुढारीने या विधानसभा निवडणुकीदरम्यान आयोजित केलेल्या विधानसभा अचूक अंदाज स्पर्धेला सांगली जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी अंतिम दिवशी कुपन्स जमा करायला सांगली कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी झाली होती.
‘कोण मारणार बाजी..? कोण उधळणार गुलाल..? या सवालांचे उत्तर देण्यासाठी दैनिक पुढारी आयोजित विधानसभा अचूक अंदाज स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 10 ते 19 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेची कुपन्स जमा करायचा शक्रवारी अंतिम दिवस होता. सवाल जबाब : राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ?, सांगलीमधून कोण बाजी मारणार?, मिरजेमधून कोण बाजी मारणार? इस्लामपूरमधून कोण बाजी मारणार? शिराळ्यामधून कोण बाजी मारणार? पलूस-कडेगावमधून कोण बाजी मारणार? खानापूरमधून कोण बाजी मारणार? तासगाव-कवठेमहांकाळमधून कोण बाजी मारणार? जतमधून कोण बाजी मारणार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? असे प्रश्न यामध्ये विचारण्यात आले होते.
या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे स्पोर्टस् गिअर सायकर, महालक्ष्मी आटा चक्की, रोनिक कुलर, वॉटर प्युरिफायर, कराओके साऊंड बार अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.