

सांगली : पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या ‘पुढारी ॲग्रीपंढरी’ या भव्य पीक प्रात्यक्षिक प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू असून, विलिंग्डन कॉलेज कंपाऊंडमधील छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या परिसरात भव्य मंडप उभारणीला सुरुवात झाली आहे. बारामतीनंतर पश्चिम महाराष्ट्रातील या प्रदर्शनाची उत्सुकता प्रचंड वाढली असून, स्टॉल बुकिंगला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
10 एकर क्षेत्रावर साकारलेल्या 40 हून अधिक पिकांच्या लाईव्ह प्लॉटस्मधील जोमदार पिके शेतकऱ्यांची प्रतीक्षा करत असून, शेतात डौलणारे भरघोस पीक डोळ्यांचे पारणे फेडणारआहे. 20 ते 23 फेबुवारी 2026 या कालावधीत सांगलीत भरणाऱ्या या कृषी महोत्सवासाठी शेतकरी आणि कृषी कंपन्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
दै. ‘पुढारी’ माध्यम समूह आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ऑर्बिट क्रॉप न्युट्रिएंट’ हे मुख्य प्रायोजक असून, ट्रॅव्हल पार्टनर अ हेवन हॉलिडेज आहेत. सहप्रायोजक कन्हैया ॲग््राो आणि चितळे डेअरी आहेत. गिफ्ट स्पॉन्सर सोन रूपम जेम्स ॲन्ड ज्वेलरी हे असणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात मशागत पूर्ण झाल्यानंतर, प्लास्टिक मल्चिंग आणि संरक्षित शेतीतील विविध आधुनिक तंत्राचा वापर करून लावलेल्या पिकांची वाढ आता जोमदार झाली आहे. प्रदर्शनाच्या चार दिवसांत शेतकऱ्यांना ही पिके प्रत्यक्ष पूर्ण वाढलेली पाहून या पिकांच्या विक्रमी उत्पादनाचे रहस्यदेखील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून उलगडणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भरघोस उत्पादनाचे तंत्रदेखील शिकता येणार आहे.
शेती क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण प्रयोग अनुभवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. बारामतीनंतर महाराष्ट्रात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर सांगलीत हे पीक प्रात्यक्षिक राबवले जात आहे. हजारो शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याची ही सुवर्णसंधी असल्याने, आघाडीच्या कृषी कंपन्यांचे स्टॉल बुक झाले आहेत. आता केवळ मोजकेच स्टॉल शिल्लक राहिले असून, इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाळासाहेब : 9850556009
सांगली (प्रशांत) : 8805007148
कंझ्युमर स्टॉल बुकिंगसाठी :
सनी : 9922930180
अमर : 9545327545
फूड स्टॉल बुकिंगसाठी
दीपा ः 8805007724
शेतकऱ्यांना काय मिळणार?
हमखास गिफ्ट : प्रदर्शनात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला 1500 रुपयांचे हमखास गिफ्ट देण्यात येणार आहे.
माती, पाण्याचे नमुने घेऊन यावे : ऑर्बिट क्रॉप न्युट्रिएंटकडून प्रदर्शनास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत माती आणि पाणी परीक्षण करून देण्यात येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी येताना माती आणि पाण्याचे नमुने घेऊन यायचे आहे.
प्रदर्शन स्थळ :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, विलिंग्डन कॉलेज कॅम्पस, सांगली
दि. 20 ते 23 फेब्रुवारी 2026,
सकाळी 10 ते रात्री 8
काय पाहायला मिळणार?
40 हून अधिक पिकांची जिवंत प्रात्यक्षिके
आधुनिक तंत्रज्ञान : कमी जागेत, कमी वेळेत जास्त गुणवत्तापूर्ण उत्पादन