Sangli Crime News | मिरजेतील उत्तमनगरमध्ये वेश्याअड्ड्यावर छापा

घरमालकिणीला अटक : दलाल महिला फरार
Sangli Crime News |
Sangli Crime News | मिरजेतील उत्तमनगरमध्ये वेश्याअड्ड्यावर छापाPudhari Photo
Published on
Updated on

मिरज : शहरातील उत्तमनगर येथे पीडित मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणार्‍या एका घरमालकिणीला अटक केली. रेणुका शांता कांबळे (वय 35) असे या महिलेचे नाव आहे. सीमा ऊर्फ ज्योती मुखर्जी ही दलाल महिला फरार झाली आहे.

याबाबत माहिती अशी, उत्तमनगर परिसरात रेणुका कांबळे व सीमा ऊर्फ ज्योती या दोघी वेश्याअड्डा चालवितात, या ठिकाणी असाहाय्य मुलींचा गैरफायदा घेत त्यांना वेश्या व्यवसायास भाग पाडले जाते, तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार सीमा ऊर्फ ज्योती ही मुली पुरविते, तर वेश्यागमन करण्यासाठी रेणुका कांबळे खोली भाड्याने देते, अशी तक्रार होती. त्यानुसार नियंत्रण शाखेकडील उपनिरीक्षक तेजश्री पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते. त्यानुसार एक बनावट ग्राहक पाठवून रेणुका कांबळे हिच्या घरात छापा टाकला. त्यावेळी त्या ठिकाणाहून एका पीडितेची सुटका करण्यात आली. रेणुका कांबळे हिला पथकाने अटक केली आहे, तर दलाल महिला सीमा ऊर्फ ज्योती ही मात्र पसार झाली आहे.

वेश्यावस्तीबरोबरच परिसरातील लॉज व काही बंगल्यांमध्येही वेश्या व्यवसाय सुरू आहे, महिलांना व मुलींना आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात आहे. पोलिसांनी संबंधित संशयितांच्या हालचालीवर लक्ष ठेवून कारवाईची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news