

सांगली : आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ताकदीने कामाला लागावे, निवडणुका या महायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या जातील, असे प्रतिपादन जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सांगली महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
ते म्हणाले, प्रत्येक प्रभागात जोमाने काम करा. उमेदवार म्हणून नव्हे, तर शिवसेना एक कुटुंब मानून सर्वांनी एकजुटीने काम करावे. संघटन मजबूत करावे. येणाऱ्या काळात सांगली शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करू. सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही.
बैठकीस जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे, जिल्हा संघटक गौरव नायकवडी, संजय विभुते, मोहन वनखंडे, महिला संपर्क प्रमुख सुनीता मोरे, जिल्हा सहसंघटक महेंद्र चंडाळे, सांगली शहरप्रमुख सचिन कांबळे उपस्थित होते.