Miraj Crime : मिरजेत क्लबवर पोलिसांचा छापा

२२ जण ताब्यात : शहराच्या मुख्य रस्त्यावर सुरू असणाऱ्या क्लबवर पोलिसांची कारवाई
illegal gambling
मिरजेत क्लबवर पोलिसांचा छापाFile Photo
Published on
Updated on

मिरज : शहरातील बस स्थानक परिसरात सुरू असणाऱ्या एका क्लबवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईवेळी तब्बल २२ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. एका राजकीय नेत्याच्या वरदहस्तामुळे हा क्लब सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गेल्या काही दिवसापासून हा पत्त्यांचा क्लब शहरातील मध्यवर्ती भागात सुरू होता. मिरज शहर पोलिसांना छाप्यावेळी क्लबमध्ये २२ जण जुगार खेळण्यासाठी आल्याचे दिसून आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मिरज बस स्थानक व रेल्वे स्थानक परिसरामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातून रोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे स्टेशन रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू आहेत. कारवाईदरम्यान पोलिसांनी पत्त्यांचे संच, अनेक मोबाईल व इतर जुगाराचे सहा हजाराचे साहित्य जप्त केले.

संदीप पंढरीनाथ सातपुते, ख्वाजा कलंदर शेख, मयूर गायकवाड, जुगार अड्डा चालक इम्रान मिरासाब निशानदार, प्रवीण चिदानंद ढाले, सूरज बाबासाहेब कांबळे, लालसाब मकबुलसाब लखमेसुर, शाहरुख निसार शेख, इब्राहिम सैफन शेख, टिपू सुलतान महंमद मुजावर, यल्लाप्पा हणमंत कोळी, शीतल आप्पासाहेब हारगे, मुस्ताक रकमुद्दीन जुनैदी, रमजान हाजी शेख, ख्वाजा मलीक शेख, भरत आप्पासाहेब पाटील, युनूस बादशाह मुजावर, सैफु सैफन जातकार, सलीम इमामहुसेन मुल्ला, नवाब बाबू शेख, अमिन सैफन शेख, सदानंद अर्जुन हळ्ळी, सुरेश शंकर गोसावी, दत्तात्रय रामचंद्र शिंदे, रवी विनायक कोलप यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news