Sangli Crime news: निर्जन ठिकाणी नशा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; सात जणांवर गुन्हा

ईश्वरपूर शहरातील निर्जन ठिकाणी तरुणांकडून मद्यपान व नशा केली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर ईश्वरपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री मद्यपींवर कारवाई केली
  Crime News
Crime News Pudhari
Published on
Updated on

ईश्वरपूर : ईश्वरपूर शहरातील निर्जन ठिकाणी तरुणांकडून मद्यपान व नशा केली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर ईश्वरपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री मद्यपींवर कारवाई केली. या कारवाईत सातजणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

चिमणीलाल गौतम पुजारी (वय 19), सुनील मनीराम जयस्वाल (20), समीर बुद्धिराम गौतम (20, सर्व रा. शिवनगर, ईश्वरपूर), विशाल विकास कदम (28), वैभव उदयसिंग कदम (30), विजय जगन्नाथ कदम (27), विशाल हरी कदम (28, सर्व रा. शिराळा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरातील ‌‘डार्क स्पॉट‌’च्या ठिकाणी अचानक छापे टाकले. कृष्णबंगला परिसरातील मोकळे पटांगण व वाघवाडी रोडलगत असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या मोकळ्या मैदानावर शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संशयितांवर ही कारवाई करण्यात आली. ते परवान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यपान करताना आढळून आले. त्यामुळे संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 84 अंतर्गत ‌‘ओपन बार‌’प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलिस निरीक्षक किरण दिडवाघ, विजय वीर, अमर जंगम, दीपक गरजे, पंकज कांबळे, श्रीकांत पवार, धनराज आवटे, रोहित कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news