Sangli Crime : बोरगावच्या माळावर बेकायदेशीर पिस्तूल विक्रीचा पर्दाफाश

दोन पिस्टलसह संशयित जेरबंद;१ लाख २ हजाराचा मुद्देमाल जप्त ; सांगली कनेक्शन उघड
Sangli Crime News
दोन पिस्टलसह संशयित जेरबंद
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : सांगली जिल्ह्यात शस्त्रबंदी लागू असतानाही बेकायदेशीरपणे शस्त्र विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला कवठेमहांकाळ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. बुधवारी (दि.१५) बोरगावच्या हद्दीतील कोड्याच्या माळावर सापळा लावून पोलिसांनी ही कारवाई केली. प्रथमेश राजेश सकपाळ (वय २८, रा. स्वामी रामकृष्ण परमहंस सोसायटी, डी-मार्ट मागे, १०० फुटी रोड, सांगली) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अवैध शस्त्रांबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहिती पथकातील पोलिस आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर कवठेमहांकाळ हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान त्यांना बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील कोड्याच्या माळावर एक तरुण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या प्रथमेश सकपाळ याची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. प्रथमेश सकपाळ याच्यावर कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news