Sangli Crime : सांगलीत प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून खंडणीची मागणी

दाम्पत्याला मारहाण; महिलेचा विनयभंग
crime news
सांगलीत प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून खंडणीची मागणीpudhari photo
Published on: 
Updated on: 

सांगली : मध्यवर्ती बस स्थानकासमोरील संजय ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाजवळ मुंबईला जाण्यासाठी थांबलेल्या एका प्रवाशाकडे चाकूचा धाक दाखवून खंडणी मागितल्याची आणि पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला, त्याच्या भावाला व पत्नीस मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल आहे.

गजानन राजाराम खांडेकर (वय ३१, रा. वसई, मूळ रा. रामजानकी मंदिरामागे, संजयनगर, सांगली) हे कुटुंबासह मुंबईला जाण्यासाठी संजय ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाजवळ आले. त्यावेळी प्रतीक जाधव, वरद कदम आणि शिंदे नामक तिघांनी संगनमत करून त्यांना अडवले. आरोपींनी फिर्यादी खांडेकर यांना चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली आणि खंडणी म्हणून पैशांची मागणी केली.

फिर्यादी आणि त्यांच्या भावाने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने संतापलेल्या संशयितांनी त्यांना सिमेंटच्या पेव्हिंग ब्लॉकने डोक्यात तसेच लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी यांची पत्नी मध्ये आली असता, संशयितांनी तिचा हात धरून ओढला आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. या मारहाणीत गजानन खांडेकर आणि अजय खांडेकर हे दोघे जखमी झाले आहेत. संशयितांचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news