Palus murder case: पलूसमधील सावकाराचा खून

धारदार शस्त्राने वार; मृतदेह जिन्याखाली सापडला
Palus murder case
Palus murder case: पलूसमधील सावकाराचा खूनPudhari
Published on
Updated on

पलूस : पलूस शहरातील कुंडलवेस परिसरात बुधवारी सायंकाळी संजय प्रभाकर परांजपे (वय 65) यांचा अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्राने डोक्यात जबर वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

संजय परांजपे हे बुधवारी सायंकाळी मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा मंदार हा त्यांचा शोध घेण्यासाठी बाहेर गेला. परांजपे अपार्टमेंटजवळ पोहोचताच मंदार याला परिसरात रक्त सांडलेले दिसून आले. त्याने तत्काळ इमारतीत राहणाऱ्या भाडेकरू दुकानदाराला याबाबत माहिती दिली. त्यानंतर दोघे मिळून घटनास्थळी गेले असता, इमारतीच्या जिन्याखालील अडगळीच्या जागेत संजय परांजपे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जबर प्रहार केल्याचे स्पष्ट दिसत होते.

घटनेची माहिती समजताच पलूस शहरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह पुढील तपासासाठी पाठविण्यात आला. संजय परांजपे हे नोंदणीकृत सावकारी व्यावसायिक म्हणून परिचित होते. त्यांच्या खुनामागील नेमके कारण काय, तसेच आरोपी कोण, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांची चौकशी आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पलूस पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news