सांगली : या सप्ताहात कांद्याचे दर पुन्हा भडकला. कांद्याचा दर प्रति किलो ४० ते ४५ रुपयांवरुन ५५ ते ६० रुपये किलो झाला आहे. सांगलीमध्ये सातारा, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून कांद्याची आवक होत असते.
पाऊस उशीरा सुरु झाल्याने आणि काही ठिकाणी अधिक पाऊस झाल्याने कांदा खराब झाला तर काही ठिकाणी उत्पादन घटले. यामुळे यंदा कांद्याची आवक ५० टक्केच झाली. गेल्या पंधरा दिवसात कांद्याचा ३०० ते १२०० रुपये क्विंटलवरुन आता ७०० ते ४ हजार ३०० रुपये क्विंटल झाला असल्याची माहिती कांदा बटाटे व्यापारी असोसिएशनचे राजेश पोपटांनी यांनी दिली. येत्या पंधरा दिवसात बेळगाव, हुबळीवरुन कांद्याची आवक नव्याने सुरु होणार असून, यामुळे दरात घट होईल, असेही ते म्हणाले.
गवारी, आले यांचे दर तेजीतच आहेत. पालेभाज्यांची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. कोथिंबिर आता ५ ते १० रुपये पेंढी झाली असून, मेथी, शेपू, चाकवत, करडई, तांदळ आदी भाज्या १० ते १५ रुपये पेंढी झाल्या आहेत. गवारी १५० ते १६० रुपये किलोंनी विक्री सुरु आहे. बटाटा २५ ते ३० रुपये तर वांगीचा दर ७० ते ८० रुपये किलो आहे. लसून १८० ते २०० रुपये किलो आहे. आल दोनशे रुपये किलो आहे. शेवग्याची पेंढीचा (पाच शेंगा) दर १५ ते २० रुपये आहे.
इतर फळभाज्यांचे दर प्रति किलो असे आहेत. हिरवी मिरची ८० ते ९० रुपये किलो आहे. बंदरी गवारी ९० ते १०० रुपये किलो आहे. दोडका ५० ते ६० रुपये, भेंडी ७० ते ८०, ढबू मिरची ६० ते ७०, बटाटा २५ ते ३० किलो आहे. कोबी २० ते ३० (गड्डा), फ्लॉवर ३० ते ४० (गड्डा), पडवळ ८० ते ९०, कारली ५० ते ६०, वाटाणा ५० ते ६० रुपये, घेवडा ६० रुपये किलो आहे. लिंबू १० रुपयांना तीन नग, दुधी भोपळा १० रुपये नग, लाल भोपळा ८० रुपये नग आहे.
सीताफळ नव्याने आवक सुरू
या सप्ताहात नव्याने सिताफळ आणि काश्मिरी सफरचंदाची आवक सुरु झाली आहे. सिताफळचा दर ६० ते ८० रुपये किलो आहे. कश्मिरचे सफरचंदाचा दर १५० ते २०० रुपये किलो आहे.
या सप्ताहात ड्रॅगन फ्रुट, विदेशी फळांची आवक वाढली आहे. ड्रॅगन फ्रुट १०० ते १५० रुपये किलो असून, नास्पती १६० रुपये किलो आहे. ऑस्ट्रलियन चेरी १८०० रुपये किलो आहे. पेरुचा दर आता ६० ते ८० रुपये किलो झाला आहे. विदेश सफरचंद २०० ते २५० रुपये किलो असून, न्यूझिलंडचे सफरचंद २५० ते २८० किलो आहेत. डाळिंब ८० ते १५०, रामफळ १४० ते १५० रुपये, देशी केळी ५० ते ६० रुपये डझन, वसई केळी ३० ते ४० डझन, पपई ३० ते ५० रुपये नग आहे. ही माहिती फळ विक्रेते अदनान मुन्शी यांनी दिली.
अंडी शेकडा ५८५ रुपये
या आठवड्यात अंडी दर किरकोळ वाढले आहेत. अंडीचा दर शेकडा ५४५ रुपयावरुन आता ५८५ रुपये झाला असून, डझनचा दर ७० रुपयेच आहे. ब्रॉयलर जिवंत कोंबडीचा दरही वाढला आहे. ब्रॉयलर चिकनचा दर १०७ वरुन ११६ रुपये झाला आहे. किरकोळ चिकनचा दर २६० ते २८० रुपये किलो आहे. मटणाचा दर स्थिर ८०० रुपये किलो आहे. गावरान कोंबड्याचा दर २५० ते ३०० रुपये (जिवंत दीड ते दोन किलो) आहे. देशी कोंबड्यांचा दर २०० ते २५० रुपये आहे. मासळीचे दर स्थिर आहेत. समुद्रातील मासळी (प्रति किलोचे दर) असा आहे. सुरमईचा दर ८७० ते ९०० रुपये असून, पांढरा पापलेट ८५० ते ९०० रुपये किलो आहे. काळा पापलेट ७५० ते ८००, रावस २५० ते २८०, वाम ३७० ते ३८०, बोंबील ३६० ते ४००, कोळंबी २५० ते ३००, राणीमासा २५० ते २६०.