

मिरज तालुक्यातील निलजी येथे महिलेवर बलात्कार करून घरफोडी केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. गजपती शिसफुल भोसले (वय 30, रा. आंबेडकरनगर, बोलवाड, ता. मिरज) असे संशयिताचे नाव आहे. ही कारवाई लिंगनूर ते बेळंकी परिसरात केली.
निलजी येथे 26 जुलै रोजी रात्री चौघा चोरट्यांनी एका घरात जबरदस्तीने प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सोने - चांदीचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. एका संशयिताने विवाहितेवर बलात्कार केला होता. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बलात्कार व घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याची दखल पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घेतली होती. या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्याचे आदेशही दिले होते. बुधवारी (दि. 21) स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चोरटा गजपती भोसले पथकाने ताब्यात घेतले. त्याने चोरीचा गुन्हा अन्य सहकार्यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. गजपती भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो खुनाच्या गुन्ह्यात पसार होता.