एकच पर्व... ओबीसी सर्व

ओबीसी महाएल्गारने सांगली दणाणली
OBC Reservation
मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, अण्णासाहेब डांगे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके आदींच्या उपस्थितीत येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. Pudhari Photo
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

गेल्या महिन्याभरापासून गावा-गावातील ओबीसींना एकत्र करून, त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत, संघर्ष करण्यासाठी एकत्र आणायचे फळ आज मेळाव्यातून दिसून आले. एकच पर्व... ओबीसी सर्व अशा घोषणांनी आणि ओबीसी महाएल्गारने सांगली दणाणली. या मेळाव्यात नेत्यांनी तर जोरदार भूमिका मांडलीच, पण गावा-गावातून आलेल्या ओबीसी बंधू-भगिनींनीही जोरदार प्रतिसाद दिला.

Summary

मेळाव्यातील मागण्या....

  • मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नका

  • 57 लाख कुणबी नोंदी रद्द करण्यात याव्यात

  • न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करा

  • सगे-सोयरेचा अध्यादेशाची अंमलबजावणी करू नये

  • जातनिहाय जनगणना करावी

  • विधानसभा, लोकसभेसाठी ओबीसींना आरक्षण द्यावे

  • क्रिमिलेअरची अट रद्द करावी

  • पंचायतराज आरक्षणाची सुनावणी लवकर करावी

सांगलीतील तरुण भारत स्टेडियमवर या ओबीसी महाएल्गारचे आयोजन करण्यात आले होते. भव्य मंडप पूर्ण भरून गेला होता. मेळावा सांगलीत असला तरी गोपीनाथ मुंडे यांचे फोटो घेऊन कार्यकर्ते सामील झाले होते. त्यांच्या फोटोंनी वातावरणात वेगळाच उत्साह जाणवत होता. ओबीसींचे नेते गोपीनाथ मुंडे... असा फलक त्यांनी हातात घेतला होता. जात छोडो, ओबीसी जोडो; एकच पर्व... ओबीसी सर्व आदी घोषणा देण्यात येत होत्या.

जोरदार मनोगते

मेळाव्यामध्ये स्वागत माजी महापौर संगीता खोत, तर प्रास्ताविक नगरसेवक विष्णू माने यांनी केले. यावेळी हरिदास लेंगरे, संजय विभुते, पांडुरंग मुरगल, इकबाल अन्सारी, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, मंगेश ससाणे, शब्बीर अन्सारी, जे. पी. ताडे, नवनाथ वाघमारे, आमदार गोपीचंद पडळकर, टी. पी. मुंडे आदींंनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या जोरदार भाषणांची चर्चा मेळाव्यानंतरही सुरू होती.

मुस्लिम संघटनेकडून फळे, पाणी वाटप

ओबीसी मेळाव्यामध्ये उपस्थितांना मुस्लिम संघटनेकडून केळी व पाणी वाटप करण्यात आले. यावेळी असिफ बावा, आयुब बारगीर, मुश्ताक रंगरेज, फिरोज पठाण आदी उपस्थित होते. मोहन कुंभार यांनी पिण्यासाठी पाण्याचा टँकर आणला होता, तर ज्योतिराम खोत यांच्या स्मरणार्थ संघटनेने पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.

...म्हणून शरद पवारांना भेटण्यास गेलो होतो

मी शरद पवारांना भेटण्यास गेलो असताना अनेक अफवा पसरवण्यात आल्या, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. ते म्हणाले की, मी भेटण्यास गेलो असताना ते झोपले होते. आजारी होते. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी बाहेर बसलो. जेव्हा ते जागे झाले, तेव्हा त्यांनी मला बोलावले. यावेळी मी त्यांना गावोगावी ओबीसी लोकांवर हल्ले होत आहेत, त्यांची दुकाने, घरे जाळण्यात येत आहेत, हेे रोखण्यात यावे, अशी मागणी केली. यासाठी त्यांनी स्वत: प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. म्हणूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हल्ले रोखण्याची मागणी केली.

सांगलीत कशाला मेळावा घेता?

सांगलीत ओबीसी मेळाव्याला राज्यातील एका नेत्याला बोलवावे, अशी विनंती करण्यासाठी ओबीसी कार्यकर्ते सांगलीतील स्थानिक नेत्याकडे गेले होते. पण येथे कशाला मेळावा घेता? घेऊ नका, असे त्याने सुनावले, असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

राष्ट्रपती व्हायचे आहे का?

आरक्षण घेऊन तुम्हाला काय राष्ट्रपती व्हायचे आहे का, असा पाणउतारा जिल्ह्यातील एका नेत्याने केल्याचा संताप प्रा. लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news