Shambhuraj Desai | महापालिकेत अद्याप भाजपाला पाठिंबा नाही : मंत्री शंभुराज देसाई

पाठिंब्याबाबत नेते एकनाथ शिंदे निर्णय देतील
Shambhuraj Desai
Shambhuraj Desai | महापालिकेत अद्याप भाजपाला पाठिंबा नाही : मंत्री शंभुराज देसाईPudhari
Published on
Updated on

सांगली : महापालिकेत भाजपला पाठिंबा देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय किंवा चर्चा झालेली नाही. याबाबत नेते एकनाथ शिंदे निर्णय देतील, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभुराज देसाई यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. दरम्यान ना. देसाई यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा महापालिका वर्तुळात खळबळ माजली आहे.

ना. देसाई म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत युतीची वाट बघत होतो. मात्र शेवटच्या दिवशी आमची आठ जागा देण्याबाबत चर्चा झाली असताना, अचानक तीनच जागा देऊ, असे भाजपाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही ऐनवेळी पॅनेल लावत उमेदवार निश्चित केले.

मंत्री देसाई यांच्या वक्तव्याने सांगली महापालिकेच्या महापौर पदाचा तिढा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना सोबत येईल असे वक्तव्य केले होते. मात्र शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी पाठिंबा देण्याबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवत चंद्रकांत पाटील यांचा दावा फोल ठरवला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, नूतन नगरसेवक युवराज बावडेकर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news