

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलविण्यात आल्याने जयंत पाटील यांना समर्थन देण्यासाठी वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. कोणीही मुंबुईला येवू नका असा संदेश देवूनही कार्यर्ते मुंबईत पोहोचले आहेत. कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.
आज (सोमवार) ईडीने जयंत पाटील यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलविले होते. या नोटीसीचा निषेध करत तालुक्यासह जिल्ह्यातून कार्यकर्ते जयंत पाटील यांना समर्थन देण्यासाठी (रविवार) रात्री मुंबईला रवाणा झाले होते. या कार्याकर्त्यांनी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला आहे. ईडी विरोधात फलक हाती घेवून राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत इडीच्या कायालयाबाहेरच ठिय्या मांडला. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा :