

ईश्वरपूर : ईश्वरपूर ते रेठरेकारखाना रस्त्यावर नरसिंहपूर (ता. वाळवा) येथे ट्रॉलीखाली सापडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पंकज नरसिंगराव पाडळकर (वय 28 रा.नरसिंहपूर) असे मृताचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री घडला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालका विरोधात ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अमोल पाडळकर याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री चालक ट्रॅक्टर ( एमएच 10 एवाय 1840 ) व ट्रॉली घेऊन रेठरे कारखान्याकडे निघाला होता. नरसिंहपूर नजिक पाठीमागून आलेल्या पंकज ( एमएच 50 पी 0848) याच्या दुचाकीला ट्रॉलीची धडक बसली. पंकज हा ट्रॉलीखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चालकाने ट्रॅक्टर तेथेच सोडून पलायन केले.