Sangli Theft Case : नागठाणेतील मोटर केबल चोरीचा २४ तासात छडा

७६ मीटर लांबीची केबल जप्त
theft
theftpudhari photo
Published on: 
Updated on: 

भिलवडी : नागठाणे (ता. पलूस) गावच्या हद्दीतील कृष्णा नदीकाठी मोटरची इलेक्ट्रिक केबल चोरीस गेल्याच्या गुन्ह्याचा भिलवडी पोलिसांनी अवघ्या २४ तासात छडा लावला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित जुबेर सलीम मुजावर (वय २२, रा. आष्टा, ता. वाळवा) याला चोरीच्या मुद्देमालासह अटक केली असून, त्याच्याकडून ७६ मीटर लांबीची केबल जप्त केली आहे.

नागनाथ आनंदा देसाई (वय ४७, रा. नागठाणे, ता. पलूस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिलवडी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत नागठाणे गावच्या हद्दीतील कृष्णा नदीकाठी ही चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद होते.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना १७ ऑक्टोबर रोजी रात्री भिलवडी पोलिस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. यावेळी नागठाणे ते आष्टा रस्त्यावरील कोडर रोड परिसरात एक संशयित इसम थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयित जुबेर सलीम मुजावर याला ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news