माझी आमदारकी कार्यकर्त्यांना बळ देणारी

आमदार सदाभाऊ खोत यांचे प्रतिपादन : तालुक्यात जोरदार स्वागत
Sadabhau Khot
इस्लामपूर : आ.सदाभाऊ खोत यांचा सत्कार करताना राहुल महाडिक, बाजूस दि. बा. पाटील, सतीश महाडिक, डॉ. सचिन पाटील, सागर खोत. Pudhari Photo
Published on
Updated on

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

माझी आमदारकी ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणारी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत वाळवा आणि शिराळा मतदार संघात महायुतीचे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करू. इस्लामपूर व आष्टा नगरपालिकेत प्रसंगी तिसरी आघाडी उभा करून निवडणूक लढवू. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन नवनिर्वाचित आमदार सदाभाऊ खोत यांनी केले.

विधान परिषद आमदार म्हणून निवड झाल्यानंतर आ. सदाभाऊ खोत यांचे वाळवा तालुक्यात आगमन झाले. पेठनाका येथे त्यांनी वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. महाडिक शैक्षणिक संकुलात त्यांचा सत्कार सांगली जिल्हा बँकचे संचालक राहुल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. स्वरूपराव पाटील, दि. बा. पाटील, सागर खोत, जयराज पाटील, जगन्नाथ माळी, निजाम मुलाणी, सतीश महाडिक, चेतन शिंदे, डॉ. सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राहुल महाडिक म्हणाले, आ. सदाभाऊ खोत यांना दुसर्‍यांदा संधी मिळाली आहे. यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. यावेळी बबन शिंदे, युवराज कदम, प्रा. प्रदीप पाटील, जयकर कदम, संग्राम गोईंगडे, विजय पाटील, विनायक जाधव, किरण उथळे, रवींद्र पाटील, डी. के. पाटील, शुभम महाडिक, आर. एम. बागडी, विजय पाटील, सुजित थोरात आदी उपस्थित होते.

भर पावसात मिरवणूक

विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आ. सदाभाऊ यांचे रविवारी वाळवा तालुक्यात आगमन झाले. इस्लामपूर शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांची भर पावसात जोरदार मिरवणूक काढण्यात आली. पंचायत समितीपासून ही मिरवणूक निघाली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीची सांगता झाली. भाजपचे विक्रम पाटील यांनी या मिरवणुकीचे आयोजन केले होते. यल्लामा चौक येथे शिवसेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी आ. खोत यांचे स्वागत केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news