Youth death: पोलिस भरतीदरम्यान मोराळेच्या तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1600 मीटर धावण्याच्या चाचणीवेळी घटना
Youth death
Youth death: पोलिस भरतीदरम्यान मोराळेच्या तरुणाचा मृत्यूPudhari
Published on
Updated on

पलूस : छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान 1600 मीटर धावण्याच्या चाचणीत एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली. संग्राम धोंडिराम शिंदे (रा. मोराळे, ता. पलूस) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे भरती प्रक्रियेच्या ठिकाणी मोठी खळबळ उडाली.

छत्रपती संभाजीनगर येथे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणी सुरू होती. संग्राम 1600 मीटर धावण्याच्या चाचणीत सहभागी झाला होता. काही अंतर पार केल्यानंतर त्याला अचानक चक्कर आली आणि तो धावतानाच मैदानावर बेशुद्ध होऊन कोसळला. मैदानावर उपस्थित पोलिस अंमलदार आणि वैद्यकीय पथकाने त्याला तत्काळ प्राथमिक उपचार देऊन शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शारीरिक ताण किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे; मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिस होण्याचे स्वप्न अधुरे; पलूस तालुक्यात शोककळा

संग्रामचे पोलिस दलात भरती होऊन कुटुंबाला आधार देण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने गेल्या अनेक दिवसांपासून कठोर सराव केला होता. त्याच्या अकाली निधनाचे वृत्त समजताच मोराळे गावासह पलूस तालुक्यात शोककळा पसरली. एका होतकरू तरुणाच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news