बलवडीमध्ये एकावर सावकारीचा गुन्हा

90 लाखांची मागणी करत शिवीगाळ करून दमदाटी
Moneylender's crime against one in Balwadi
बलवडीमध्ये एकावर सावकारीचा गुन्हा File Photo
Published on
Updated on

विटा : पुढारी वृत्तसेवा

मुद्दलसह व्याजाचे 90 लाख रुपये दे, म्हणत तगादा लावून दमदाटी व शिवीगाळ करणार्‍या जगन्नाथ दत्तू पवार (बलवडी भा., ता. खानापूर) याच्याविरुद्ध मनोहर ईश्वर पवार (बलवडी भा.) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. जुलै 2017 ते आजपर्यंत वेळोवेळी पलूस, बलवडी येथे पवार यांच्याकडे पैशाची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Moneylender's crime against one in Balwadi
सावकारी प्रकरण : दोन लाखांच्या बदल्यात उकळले दहा लाख

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, मनोहर पवार यांनी काजू प्रक्रिया व्यवसायाकरिता तसेच मुलाच्या उपचाराकरिता जगन्नाथ पवार याच्याकडून जुलै 2017 पासून मे 2020 पर्यंत वेळोवेळी 40 लाख रुपये मुद्दल तीन टक्के दरमहा व्याजाने घेतली असून, त्यापोटी जुलै 2017 पासून नोव्हेंबर 2019 पर्यंत तीन टक्के दरमहा व्याज दराने वीस लाख रुपये दिले आहेत. तरीही जगन्नाथ पवार याने मनोहर पवार यांच्या पलूस येथील घरी पहाटे, तसेच बलवडी येथील घरी रात्रीच्यावेळी येऊन व्याजाच्या पैशाकरिता तगादा लावून पिळवणूक केली आहे.

फलटण : सावकारी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

30 जून 2023 रोजी मनोहर पवार यांच्या मालकीच्या बलवडी (भा) येथील गट नंबर 230 मधील 67. 87 आर, गट नंबर 113 / 1 मधील 59. 68 आर क्षेत्राचे नव्वद लाख रुपये मनोहर पवार यांच्याकडून वेळोवेळी रोख स्वरूपात काजू प्रक्रिया व्यवसायाकरिता दिल्याबाबत पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने लेखी करारपत्र, साठेखत करून घेतले आहे. त्या नोटरीच्याआधारे तो मनोहर पवार यांच्याकडे पैशाबाबत वारंवार तगादा लावून त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून त्यांची पिळवणूक करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जगन्नाथ पवार याच्याविरुध्द महाराष्ट्र सावकारीअन्वये गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news