Miraj Crime : लग्न समारंभातून नेकलेस चोरणाऱ्या महिलेला अटक

मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime News
Crime NewsPudhari Photo
Published on
Updated on

मिरज : शहरातील एका मंगल कार्यालया मधून लग्न समारंभातून बंगाली नेकलेस चोरणाऱ्या महिलेला मिरज शहर पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून २ लाख ८० हजार रुपये किमतीचे बंगाली नेकलेस जप्त करण्यात आली आहे.

शहरातील सुरभी हॉलमध्ये ८ जून २०२५ रोजी लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वधू कक्षातून विद्या महादेव चौगुले या महिलेचे २ लाख ८० हजार रुपये किमतीचे बंगाली नेकलेस चोरीला गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी तपास सुरू केला होता. लग्न समारंभासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व नातेवाईकांची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी चौगुले यांच्या नात्यातीलच महिलेने दागिने चोरले असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. त्यानुसार मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटेकरांच्या पथकाने बेळगाव जिल्ह्यातील कागवाड येथून संबंधित चोरट्या महिलेला अटक केली आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news