Miraj Traffic Police: मिरजेत सडकसख्याहरींना दणका

४२ वाहनधारकांवर कारवाई; ३४ हजारांचा दंड वसूल
Miraj Traffic Police: मिरजेत सडकसख्याहरींना दणका
Published on
Updated on

मिरज : मिरजेत पोलिसांनी रोडरोमियांना चांगलाच दणका दिला. तब्बल ४२ दुचाकीस्वारांवर कारवाई करत ३४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मिरजेत विना नंबरप्लेटची दुचाकी, फॅन्सी नंबरप्लेटची दुचाकी आणि ट्रीपलसीट वावरणार्‍या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, कुपवाड रस्ता, महाविद्यालये, आंबेडकर उद्यान या ठिकाणी अचानकपणे नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news