Miraj illegal soil extraction: मिरज तालुक्यात मातीचा बेसुमार, अवैध उपसा

महसूल सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश
Miraj illegal soil extraction
Miraj illegal soil extractionPudhari
Published on
Updated on

मिरज : मिरज तालुक्यात कृष्णा नदीकाठी बेसुमार माती उपसा सुरू आहे. या माती उपशामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी झाली आहे. याबाबतच्या तक्रारीमुळे बेकायदा माती उत्खननाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे महसूल अव्वल सचिव यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

तालुक्यातील वड्डी येथील एका व्यक्तीने मौजे ढवळी (ता. मिरज) तालुक्यात कृष्णा नदीकाठ परिसरात गेल्या दहा वर्षांपासून बेकायदा माती उत्खननाबाबत तक्रार केली आहे. याप्रकरणी भूविज्ञान व खणिकर्म उपसंचालक कार्यालयाकडील भौगोलिक माहिती प्रणाली सहायक यांचेकडून मिरज तालुक्यातील खाणपट्टे व तात्पुरते परवान्याची इटीएस मोजणी सुरू असून त्यांचेमार्फत नदीकाठी माती उत्खननासाठी परवानगी दिलेल्या गटांची इटीएस मोजणी करून घ्यावी, झालेले उत्खनन व भरणा केलेले स्वामित्वधनाची चलने याचा ताळमेळ घेऊन ज्यादा उत्खनन झाले असल्यास संबंधितावर महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, संबंधित तक्रारदारांनी राज्याच्या महसूल विभागाच्या सचिवांकडे लेखी तक्रार केली आहे. याबाबत संबंधित यंत्रणेवर कारवाई न केल्यास हरित लवाद व उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून राज्याचे महसूल अवर सचिव यांनी याबाबत आवश्यक ती कार्यवाही करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news