मिरज: घरपट्टी वसुलीबाबत झोपेचे सोंग, नगरसेवकाचे अनोखे आंदोलन

मिरज: घरपट्टी वसुलीबाबत झोपेचे सोंग, नगरसेवकाचे अनोखे आंदोलन

मिरज पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडून गोरगरिबांना भरमसाठ बिले देण्यात येत आहेत. परंतु राजकीय नेत्यांच्या घरपट्टी वसुलीबाबत झोपेचे सोंग घेतले जात आहे. त्यामुळे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महापालिकेत झोपेचे सोंग घेतल्याचे अनोखे आंदोलन केले.

महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडून मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी वसुली करण्यात येत आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सामान्य जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. परंतु महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडून गोरगरिबांना भरमसाठ बिले देण्यात येत आहेत.

वसुलीसाठी तगादा लावला जात आहेत. पण राजकीय नेत्यांच्या घरपट्टी वसुलीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे. ती वसुली करण्याची मागणी केल्यास घरपट्टी विभाग झोपेचे सोंग घेत आहे, असे थोरात यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news