Miraj Election: मिरजेत तिरंगी ते पंचरंगी लढती

काँग्रेस उमेदवार गायत्री कुल्लोळी यांची माघार; शुभांगी देवमानेंचे सर्व अर्ज बाद : 23 जागांसाठी 128 उमेदवार रिंगणात
Miraj Election
Miraj Election: मिरजेत तिरंगी ते पंचरंगी लढतीPudhari Photo
Published on
Updated on

मिरज : महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मिरजेतील एकूण सहा प्रभागांमध्ये कोणाची लढत कोणाशी होणार, हे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. येथे काही प्रभागांमध्ये तिरंगी, काही ठिकाणी चौरंगी, तर काही ठिकाणी पंचरंगी लढती होणार आहेत.

शुक्रवारी काँग्रेसच्या उमेदवार व माजी नगरसेविका गायत्री कुल्लोळी यांनी प्रभाग क्र. 7 मधून माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका शुभांगी देवमाने यांचा अपक्ष अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस व जनसुराज्य पक्षाचे दोन्ही अर्ज बाद ठरविण्यात आले. मिरजेत एकूण 23 जागांसाठी 128 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यामध्ये सुमारे 90 हून अधिक उमेदवार हे विविध पक्षांचे अधिकृत उमेदवार आहेत, तर अन्य अपक्ष उमेदवार आहेत.

प्रभाग 3 मध्ये अ गटात भाजपच्या सुनिता व्हनमाने, शिंदे शिवसेनेचे सागर वनखंडे, उबाठाच्या अर्चना चॅको, ब गटात भाजपच्या शशिकला दोरकर, राष्ट्रवादीच्या रेश्मा चौधरी, क गटात भाजपच्या छाया जाधव, राष्ट्रवादीच्या शैला दुर्वे, उबाठाच्या सुग्राबी मुजावर, ड गटात भाजपचे संदीप आवटी, राष्ट्रवादीचे दिगंबर जाधव, मनसेचे विकास मगदूम, अपक्ष सूरज पाटील यांच्यात लढत होणार आहे.

प्रभाग 4 मध्ये अ गटात भाजपच्या अपर्णा शेटे, राष्ट्रवादीच्या सिद्धी पिसे, शिंदे शिवसेनेच्या शुभांगी रूईकर, अपक्ष निलोफर मणेर, ब गटात भाजपच्या विद्या नलावडे, राष्ट्रवादीच्या रेखा भगत, शिंदे शिवसेनेच्या मुग्धा गाडगीळ, क गटातून भाजपचे मोहन वाटवे, राष्ट्रवादीचे शिशिर जाधव, शिंदे शिवसेनेचे गजानन मोरे, ड गटातून भाजपचे निरंजन आवटी, राष्ट्रवादी पुरस्कृत शैलेश देशपांडे यांच्यात लढत होणार आहे.

प्रभाग 5 मध्ये अ गटातून भाजपच्या बिस्मिल्ला शेख, राष्ट्रवादीच्या शिरिन पिरजादे, शिंदे शिवसेनेच्या निर्मला घोडके, अपक्ष मालन हुलवान, ब गटात भाजपच्या मीनाक्षी चौगुले, बबिता मेंढे, शिंदे शिवसेनेच्या रुक्मिणी अंबिगेर, उबाठाच्या जैदाबी बारगीर, क गटात भाजपच्या राकेश शिंदे, काँग्रेसचे संजय मेंढे, शिंदे शिवसेनेचे अमानुल्ला सय्यद, उबाठाचे इक्रा मकानदार, ड गटात भाजपच्या राज कबाडे, राष्ट्रवादीचे करण जामदार, शिंदे शिवसेनेचे चंद्रकांत मैगुरे, उबाठाचे असलम सौदागर यांच्यात लढत आहे.

प्रभाग 6 मध्ये अ गटात भाजपच्या मुनेरा शरीकमसलत, अजित पवार राष्ट्रवादीच्या नर्गिस सय्यद, काँग्रेसच्या मुबश्रीन बागवान, ब गटात भाजपच्या अनिता कोरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जरीना बागवान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बिल्कीस बुजरूक, शिवसेनेच्या झीनत काझी, क गटातून शरद पवार राष्ट्रवादीचे समीर कुपवाडे, भाजपचे अल्लाबक्ष काझी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आझम काझी, शिवसेना उबाठा पक्षाचे बासितअली पठाण, शिवसेना पुरस्कृत सोमनाथ हुलवान, ड गटातून भाजपचे अल्लाबक्ष गडेकरी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मैन्नुद्दीन बागवान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सौरभ तहसीलदार, शिंदे शिवसेनेचे इस्माईल कुरणे, अपक्ष अल्लाउद्दीन काझी हे लढणार आहेत.

प्रभाग 7 मध्ये अ गटात भाजपच्या उज्ज्वला कांबळे, शिंदे शिवसेनेच्या सुनीता कोकाटे, उबाठाच्या सोनाली कांबळे, ब गटातून भाजपचे दयानंद खोत, काँग्रेसचे विशाल कलगुटगी, शिंदे शिवसेनेचे आनंद रजपूत, उबाठाचे महादेव हुलवान, अपक्ष प्रसाद मदभावीकर, क गटातून बानू जमादार, शिंदे शिवसेनेच्या लतिका शेगणे, उबाठाच्या दीक्षा गायकवाड, ड गटातून भाजपचे गणेश माळी, शिंदे शिवसेनेचे विलास देसाई, काँग्रेसचे अरबाज खतीब, मनसेचे विठ्ठल शिंगाडे हे लढणार आहेत.

प्रभाग 20 मध्ये अ गटातून भाजपच्या तृप्ती कांबळे, शरद पवार राष्ट्रवादीच्या प्रगती कांबळे, अजित पवार राष्ट्रवादीच्या रेखा कांबळे, शिंदे शिवसेनेच्या सुहाना नदाफ, उबाठाच्या दिया कांबळे, ब गटातून भाजपचे सुनील गवळी, शरद पवार राष्ट्रवादीचे संतोष कोळी, अजित पवार राष्ट्रवादीच्या अश्विनी कोळी, शिंदे शिवसेनेचे विकास सूर्यवंशी, जनसुराज्य शक्तीच्या स्वाती पारधी, क गटातून भाजपचे योगेंद्र थोरात, शरद पवार राष्ट्रवादीचे अभिजित हारगे, अजित पवार राष्ट्रवादीचे अतहर नायकवडी, शिंदे शिवसेनेचे वाजीद खतीब, उबाठाचे सचिन कोरे हे लढणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news