Miraj chain snatching: धावत्या रेल्वेत चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यास अटक

चोरटा कोल्हापूर जिल्ह्यातील; सोन्याची चेन जप्त : आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
Chain Snatching
Chain SnatchingPudhari
Published on
Updated on

मिरज : मिरज रेल्वे स्थानकात दादर ते हुबळी या धावत्या एक्स्प्रेसमधून महिलेची सोन्याची चेन चोरणाऱ्या सराईत चोरट्याला मिरज रेल्वे पोलिसांनी अटक केली. उत्तम राजाराम बारड (वय 36, रा. धामोड, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीतील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे.

दादर ते हुबळी एक्स्प्रेसमधून दि. 30 मार्च रोजी शीतल पाटील या एस 3 बोगीतून मिरज ते बेळगाव असा प्रवास करीत होत्या. हुबळी एक्स्प्रेस मिरज स्थानकातून पहाटे साडेपाच वाजता सुटली. यावेळी मिरजेतील फलाट क्रमांक 1 वर पाळत ठेवून असलेला सराईत चोरटा उत्तम बारड याने रेल्वे सुटल्यानंतर धावत रेल्वेचा पाठलाग केला. त्यानंतर एस 3 बोगीतून प्रवास करणाऱ्या शीतल पाटील यांच्या गळ्यातील 30 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चेनला हिसडा मारून पलायन केले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली होती.

याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर मिरज रेल्वे पोलिस चोरट्याचा शोध घेत होते. तपासादरम्यान उत्तम बारड या सराईत चोरट्याने ही चोरी केली असल्याचे निदर्शनास आले. यानंतर मिरज रेल्वे पोलिसांनी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जप्त केली आहे. दरम्यान, उत्तम बारड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 25 हून अधिक जबरी चोऱ्या आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमध्ये मिरज रेल्वे पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुभाष मुंढे, उपनिरीक्षक नंदिनी मोहिते, हवालदार तोफिक पटेल, अमर सावंत, मोसिन पटेल, अन्सार मुजावर आणि अनिल घोलप यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news