Miraj Crime : मिरजेत नशेखोरांनी पोलिसाला भोसकले

प्रकृती गंभीर : एसटी वाहकाला मारहाणीतून वाचवताना हल्ला
Miraj Crime News
मिरजेत नशेखोरांनी पोलिसाला भोसकले
Published on
Updated on

मिरज : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर नशेखोर एसटी अडवून वाहकाला मारहाण करीत असताना त्याला सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच भोसकण्यात आले. ही घटना मंगळवार, दि. २५ रोजी रात्री ९ वाजता घडली. यामध्ये महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडील कोंडीबा सरगर हे पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून रात्री कोल्हापूर ते जालना बस निघाली होती. यावेळी मार्केट यार्डमधून दोघे हल्लेखोर रस्त्यावर आले. हे हल्लेखोर आणि एसटी चालकामध्ये वाद सुरू झाला. यावेळी वाहकानेही वाद घातल्याने दोघे हल्लेखोर आणि एसटी वाहकामध्ये जोरदार वादावादीचा प्रकार सुरू होता. यावेळी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे कोंडीबा सरगर हे पोलिस कर्मचारी तिथून निघाले होते. यावेळी रस्त्यावरच गोंधळाचा प्रकार सुरू असल्याने त्यांनी नशेखोरांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघा हल्लेखोरांनी थेट कोंडीबा सरगर यांनाच धारदार हत्याराने भोसकले. यानंतर गंभीर जखमी झालेल्या सरगर यांना तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरीक्त पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले, महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, मिरज वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक रणजित तिप्पे यांच्यासह अधिकाऱ्यांनी मिरज शासकीय रुग्णालयात धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news