Miraj Crime : मिरजेत कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक

किसान चौक परिसरात पोलिसांची कारवाई
Miraj Crime News
मिरजेत कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक
Published on
Updated on

मिरज : मिरज शहरातील किसान चौक परिसरामध्ये कोयता आणि चाकू घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. उबेद निसार शेख (वय १९, रा. रेवणी गल्ली, मिरज) आणि साबीर नन्हेसाब बेपारी (वय २०, रा. टाकळी रस्ता, मिरज) अशी त्यांची नावे आहेत.

वरील दोघेही किसान चौक परिसरातून दुचाकीवरून दोन कोयते आणि चाकू घेऊन दहशत माजवत निघाले होते. मिरज शहर गुन्हे प्रकटीकरणच्या पथकास ते निदर्शनास आल्याने पथकाने त्यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन कोयते आणि चाकू जप्त करण्यात आला. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news