Miraj News : मिरज सभापती, उपसभापती निवड ४ ऑगस्टला

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : मिरज प्रांतांची नियुक्ती
Sabhapati Election
सभापती, उपसभापती निवड
Published on
Updated on

मिरज : मिरज पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड ४ ऑगस्टला घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी बुधवारी दिले. या निवडीसाठी विशेष सभा घेण्याचे आदेश मिरजेचे प्रांताधिकारी यांना दिले आहेत.

मिरज पंचायत समितीची पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर २२ सदस्य संख्या असणाऱ्या या पंचायत समितीमध्ये ११ भाजपचे सदस्य निवडून आले होते. या निवडणुकीनंतर १० मार्च २०२६ रोजी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक पंचायत समिती सभागृहात झाली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सदस्य पांडुरंग इंगळे मतदानासाठी पोहोचू नयेत, म्हणून त्यांचे ९ मार्च रोजी सायंकाळी अपहरण करण्यात आले होते. याबाबत त्यांचा मुलगा अमर इंगळे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली होती. त्यामुळे इंगळे यांना त्यांचा वैधानिक मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. त्यामुळे ही निवडणूक बेकायदेशीर झाली आहे. या निवडणुकीमध्ये अकरा विरुद्ध दहा अशा केवळ एका मताच्या फरकाने सभापती तन्वी कमलेकर व उपसभापती ललिता शेजूळ यांची निवड जाहीर करण्यात आली.

ही निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर झाली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अवैध व बेकायदेशीर घोषित करण्यात यावी, अशी मागणी पुणे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार पुणे आयुक्तांकडे याबाबत सुनावणी झाली. त्यांनी ही प्रक्रिया रद्द करून सभापती पदाची निवडणूक नव्याने घेण्याचे आदेश दिले. मात्र, पंचायत समिती प्रशासनाला याबाबतचे आदेश मिळालेले नव्हते.

...असा होणार निवडणूक कार्यक्रम, विशेष सभा

सभा - ४ ऑगस्ट

सभापती, उपसभापती पदासाठी अर्ज स्वीकृती - सकाळी ११ ते १२ छाननी - १२ ते १२.३०

माघारीची मुदत - १२ ते १

सभा - दुपारी २ वाजता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news