Miraj Crime : मिरज पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकाऱ्यास शिवीगाळ

भाजपाचे सदस्य विनायक जाधव यांच्यावर गुन्हा
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

मिरज : मिरज पंचायत समितीत सत्ताधारी भाजप सदस्याने पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला दूरध्वनीवरून शिवीगाळ करीत बघून घेण्याची दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विस्तार अधिकारी शिवानंद कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाजप सदस्य विनायक जाधव यांच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप सदस्य विनायक जाधव यांनी विस्तार अधिकारी शिवानंद कोळी यांना फोन केला होता. 'कसबे डिग्रज येथील ग्रामपंचायत दुकान गाळ्यांच्या प्रोसिडिंगचे काय झाले?' अशी विचारणा करत जाधव यांनी शिवानंद कोळी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि 'बघून घेईन' अशी थेट दमदाटी केली, असे तक्रारीत म्हटले आहे. सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात विनायक जाधव यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

या घटनेमुळे सांगली जिल्ह्यातील सत्ताधारी भाजप आणि पंचायत समिती प्रशासन यांच्यातील सुप्त वाद आता थेट चव्हाट्यावर आला असून प्रशासकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news