Miraj Panchayat Samiti: मिरज पंचायत समितीवर लावला बाबासाहेब आंबेडकर यांचा नामफलक

चळवळीतील कार्यकर्त्यांचा जल्लोष : पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी
Miraj Panchayat Samiti: मिरज पंचायत समितीवर लावला बाबासाहेब आंबेडकर यांचा नामफलक
Published on
Updated on

मिरज : मिरज पंचायत समितीच्या नव्या इमारतीला गुरुवारी मिरज तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी अचानक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक लावून नामकरण केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी या नामफलकावर पुष्पवृष्टी करत फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

मिरज पंचायत समितीच्या जुन्या इमारतीतील सभागृहाला ‘स्वर्गीय वसंतदादा पाटील सभागृह’ असे नाव होते. पंचायत समितीची नवीन इमारत बांधल्यानंतर या इमारतीतील नव्या सभागृहालादेखील वसंतदादांचेच नाव देण्याचा ठराव केला होता. मात्र, भाजपने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते केलेल्या उद्घाटनावेळी या नव्या सभागृहाला 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह' असे नाव दिले. यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादंग सुरू आहे.

दरम्यान, ४ ऑगस्ट रोजी नव्या सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीच्या सदस्यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच गुरुवारी सकाळी अचानक बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, विश्वास खांडेकर यांच्यासह काही कार्यकर्ते पंचायत समिती आवारात जमा झाले.

या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या इमारतीला 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' असा फलक लावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news