Miraj Accident : मिरज अपघातातील जखमी तरुणीचा मृत्यू

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

मिरज : शहरातील किसान चौकात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सय्यदारोशनी सय्यदमेहबुबअली कादरी (वय २०, रा. गुरुवार पेठ, मिरज) असे मृत तरुणीचे नाव आहे. या अपघातप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीसह दुचाकीमालक आणि रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन तरुणीकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही ती मोपेड घेऊन निघाली होती. यावेळी तिच्यासोबत सय्यदारोशनी कादरी ही पाठीमागे बसली होती. किसान चौक ते जवाहर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका रिक्षा चालकाने आपली रिक्षा रस्त्याच्या मध्यभागी उभी केली होती. याचा अंदाज न आल्यामुळे अल्पवयीन तरुणीचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट रिक्षावर जाऊन आदळली.

अपघातात सय्यदारोशनी कादरी दुचाकीवरून रस्त्यावर पडली. तिचे डोके रिक्षावर आदळल्यामुळे मोठा रक्तस्त्राव झाला. तिला तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालक अल्पवयीन तरुणी, दुचाकीचे मालक रियाज रफीक कुरेशी आणि रिक्षा चालक, अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news