मिरजेतील खून पोलिसांना टीप देण्याच्या वादातून

दोघांना अटक : मुख्य संशयित पसार : पोलिसांची पथके रवाना
Miraj murder case
मिरजेतील खून पोलिसांना टीप देण्याच्या वादातून झाल्याचे उघडकीस आले आहेFile Photo
Published on
Updated on

मिरज : पोलिसांना टीप देण्याचा वाद विकोपाला गेल्यानेच कोयता गँगमधील सराईत गुन्हेगार कुणाल दिनकर वाली याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. कुणाल वाली याच्या खूनप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. रूपेश होळकर (वय 40) आणि प्रज्ज्वल ऊर्फ गज्या नायडू (24, दोघे रा. कमानवेस, मिरज) अशी त्यांची नावे आहेत. मुख्य संशयित अजय भोसले हा पसार आहे.

कुणाल वाली आणि मुख्य संशयित अजय भोसले यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. अजय भोसले हा पोलिसांना आपली टिप देत असल्याचा राग कुणाल वाली याच्या मनात होता. याच कारणातून कुणाल वाली आणि त्याचा भाऊ वंश वाली हे दोघे याचा जाब विचारण्यासाठी कमानवेस येथे गेले होते. यावेळी त्यांनी सोबत कोयता देखील नेला होता. यावेळी अजय भोसले आणि कुणाल वाली या दोघांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. यानंतर झालेल्या झटापटीत अजय भोसले, रूपेश होळकर आणि प्रज्ज्वल ऊर्फ गज्या या तिघांनी कुणाल आणि वंश या दोघांवर कोयत्याने हल्ला चढविला. छातीवर वर्मी घाव बसल्याने कुणाल याचा जागीच मृत्यू झाला, तर वंश याच्या डोक्यात आणि हातावर वार बसल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर संशयितांनी तिथून पलायन केलेे. सोमवारी दुपारी रूपेश आणि प्रज्ज्वल ऊर्फ गज्या या दोघांना मिरज शहर पोलिसांनी अटक केली.

त्याच्याच हत्याराने हल्ला केल्याचा संशय

अजय भोसले याच्यावर हल्ला करण्यासाठी कुणाल हत्यार घेऊन गेला होता, अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु हल्ला होणार याची चाहूल लागल्यानंतर अजय भोसले याने कुणालकडे असलेल्या हत्यारानेच त्याच्यावर हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत तपास सुरू आहे.

सराईत गुन्हेगार

कुणाल वाली हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर यापूर्वी मोक्कादेखील लावण्यात आला होता. मोक्कातून तो जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याचा खून करण्यात आला आहे. कुणालवर अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कोयता गँगच्या गुन्ह्यासह पिस्तूल बाळगल्याप्रकरणीदेखील त्याच्यावर महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news