Miraj News : नोकरीच्या आमिषाने २८ लाखांचा गंडा

सोलापूर जिल्ह्यातील आठजणांवर गुन्हा
 Job Fraud
नोकरीच्या आमिषाने २८ लाखांचा गंडाFile Photo
Published on: 
Updated on: 

मिरज : सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २८ लाख ५०० रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महादेव आनंदराव बिराजदार (रा. सोलापूर) याच्यासह वर्मा, शर्मा, राव, मिश्रा, सक्सेना आणि देशपांडे (पूर्ण नावे व पत्ते नाहीत) अशा आठजणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवाण्णा सहदेव मगदूम (रा. लिंगनूर, ता. मिरज) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंगनूर येथील देवाण्णा मगदूम यांची महादेव बिराजदार याच्याशी काही महिन्यांपूर्वी ओळख निर्माण झाली होती. या ओळखीतून बिराजदार याने इतर संशयितांच्या मदतीने मगदूम यांचा मुलगा प्रमोद, जावई शीतल किणिंगे आणि सून ज्योती यांना शासकीय विभागांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होती. त्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी २० लाख रुपये उकळले. तसेच विलास भीमराव पाटील यांचा मुलगा अमोल यालाही शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून संशयितांनी ८ लाख ५०० रुपये घेतले.

पैसे देऊनही चौघांना नोकरी न मिळाल्याने मगदूम आणि पाटील यांनी वारंवार विचारणा केली. मात्र, संशयितांकडून टाळाटाळ केली जात असल्याने त्यांनी दिलेली रक्कम परत मागितली. पण रक्कम परत न दिल्याने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांत धाव घेण्यात आली. सांगली आर्थिक गुन्हे शाखा आणि मिरज ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news