Sangli Accident : पारे येथे बसची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

तिघे जखमी
Accident
Accident Pudhari
Published on: 
Updated on: 

विटा : विटा-पारे रस्त्यावर पारे (ता. खानापूर) गावच्या हद्दीत बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले. बसवराज भीमराव बंडीगनवर असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी बस चालकाला अटक करण्यात आली असून, जखमी दिलीप जगन्नाथ बावणे (वय ३९, रा. भवानी माळ, विटा) यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा अपघात मंगळवार, दि. ६ रोजी सकाळी ९ वाजता घडला.

अपघातात दिलीप बावणे यांच्यासह संतोष गुराप्पा उन्सीकट्टी (मूळ रा. कदरोळी, ता. कित्तूर, जि. बेळगाव; सध्या रा. नेवरी रोड, विटा) आणि कुंडलिक रामाप्पा करवीण (मूळ रा. अवरादी, ता. कित्तूर, जि. बेळगाव; सध्या रा. नेवरी रोड, विटा) हे तिघे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप बावणे, संतोष उन्सीकट्टी, कुंडलिक करवीण व बसवराज बंडीगनवर हे चौघे दुचाकीवरून (क्र. एमएच ११ बीएफ ७२७०) विटा-पारे रस्त्याने पारेच्या दिशेने चालले होते. या वेळी समोरून येणाऱ्या बसच्या (क्र. एमएच १४ बीटी ५०५६) चालकाने दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत बसवराज बंडीगनवर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर इतर तिघे जखमी झाले. या प्रकरणी बसचालक संदीप पांडुरंग कदम (रा. उपाळे-मायणी, ता. कडेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news