Miraj News: मिरजेत बनला भारतातील पहिला सिंथेटिक तबला

तीन वर्षांच्या संशोधनाला यश; परदेशात मोठी मागणी
Miraj News
मिरजेत बनला भारतातील पहिला सिंथेटिक तबला
Published on
Updated on

जालिंदर हुलवान

मिरज : पूर्वी जनावरांच्या कातड्यांपासून तबले बनवले जात होते. मात्र मिरजेतील तबला निर्माते विजय व्हटकर यांनी तीन वर्षांच्या संशोधनानंतर सिंथेटिक तबला बनवण्यात यश मिळवले आहे. उत्तम स्वर या सिंथेटिक तबल्यातून निर्माण होतात. या सिंथेटिक तबल्याला परदेशात मोठी मागणी आहे.

मिरज ही संगीतनगरी आहे. येथे तयार होणारे तंतुवाद्य महाराष्ट्र आणि भारतातच नव्हे, तर जगभरामध्ये आजही जातात. मिरजेच्या तंतुवाद्याची भुरळ जगभरातील मोठमोठ्या संगीतकारांना आहे. अनेक गायक आणि संगीतकार हे मिरजेतून वाद्य खरेदी करतात. कुरियर, पोस्ट याद्वारे ही वाद्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवली जातात. भारताच्या कानाकोपर्‍यातून येणारे तंतुवाद्य कलाकार ही मिरजेत येऊन वाद्ये घेऊन जातात. सतार, तबला, वीणा यास विविध प्रकारचे तंतुवाद्य हे मिरजेतून घेतले जातात.

तबल्यातून सूरही काढणारे जादूगार तबला मास्टर उस्ताद झाकीर हुसैन यांना मिरजेच्या तबल्याबाबत विलक्षण आकर्षण होते. उस्ताद झाकीर हुसैन हेदेखील मिरजेचा तबला वाजवत होते. सांगलीत ‘अ ब क ड ग्रुप’ने आयोजित केलेल्या संगीत महोत्सवासाठी ते 1993 मध्ये आले होते. त्यानंतर मिरजेतील व्हटकर बंधूंची तेथे ओळख झाली. व्हटकर बंधू यांनी बनवलेला तबला त्यांना आवडला. तेव्हापासून गेल्या 30 वर्षांत उस्ताद झाकीर हुसैन यांनी मिरजेचाच तबला वापरला. अगदी झाकीर हुसेन यांनी अखेरच्या श्वासापर्यंत मिरजेचा तबला वापरला.

मिरजेमध्ये तंतुवाद्यांमध्ये विविध प्रकारचे संशोधन केले जात आहे. त्याला यशदेखील मिळत आहे. मिरजेतील तबला बनविणारे विजय व्हटकर यांनी तीन वर्षांपूर्वी असेच संशोधन केले. त्याला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांकडूनदेखील मदत मिळाली. सध्या वापरले जाणारे तबले हे बकरी किंवा अन्य प्राण्यांच्या कातड्यापासून बनवले जातात. मात्र व्हटकर यांनी कातड्याऐवजी सिंथेटिकचा वापर करून असा तबला बनविला आहे. कातड्यापासून बनवलेला तबला हा काही ठराविक हवामानामध्ये सुस्थितीत वाजत नाही. मात्र हा सिंथेटीक तबला सर्व प्रकारच्या उष्ण किंवा थंड असणार्‍या हवामानामध्ये त्याच सुस्थितीत वाजतो. तबला वाजवण्यापूर्वी प्रचलित असणार्‍या सध्याच्या तबल्यांना हातोडीने अनेक वेळा ठीक केले जात होते. मात्र नव्याने बनवण्यात आलेल्या सिंथेटिक तबल्याला हातोड्याने मारण्याची गरजच नाही, अशी खास वैशिष्ट्ये या नव्या सिंथेटिक तबल्याची आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news