

लिंगनूर : मिरजपूर्व भागातील आरग, बेळंकी, सलगरे, लिंगनूर, खटाव या प्रमुख गावांत दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनादिवशी व दोन दिवस आधीपासून विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मोठा उत्साह दिसून आला.
लक्ष्मीपूजनाच्या साहित्याची खरेदी, फुलांची खरेदी, वस्त्र, सोने यांच्या खरेदीसोबत दिवाळी सुरू होण्यापूर्वी किराणा मालाची खरेदी यामध्ये मोठी उलाढाल झाली आहे. मिरजपूर्व भाग तसेच सीमा भागातील गावांतून ग्राहक या बाजारपेठांमध्ये मागील आठवड्याभरापासून येत आहेत. सलगरे व आरग या प्रमुख दोन बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री झाली आहे. त्यामुळे बाजारामध्ये उत्साह दिसून येत होता. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन या सर्वच दिवशी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेमध्ये गर्दी झाली होती. सलगरे येथे सायंकाळी रस्ते गर्दीने फुलून गेले होते.